नागपूर | जीएसटी कायदा चुकीचा नाही, हे सांगताना आम्हाला घाम फुटतो, असं वक्तव्य केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केलं आहे. ते नागपुरमध्ये बोलत होते.
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायदा सर्व पक्षांच्या संमतीने लागू झाला आहे, असं असतानाही विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केले जातं. त्यामुळे आम्हाला जीएसटी चुकीची नाही सांगताना घाम फुटतो, असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, जीएसटीमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या सुधारण्याची तयारी सरकारची आहे. तसा प्रस्ताव दिल्यास त्रुटी दुरुस्त केल्या जातील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!
-गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी
-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?
-बुखारींचे मारेकरी भाजप आमदाराला माहित आहेत; त्यांची चौकशी करा!
-…म्हणून मोदी सरकारने पीडीपीशी युती तोडली; अमित शहांचा खुलासा