देश

“महाराष्ट्रात सीबीआयला प्रवेश नाकारणं म्हणजे कायद्यालाच आव्हान देण्यासारखं आहे”

नवी दिल्ली | सीबीआयला यापुढे सरकारच्या परवानगीशिवाय राज्यात चौकशी करु शकणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावरून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीये.

महाराष्ट्रात सीबीआयला प्रवेश नाकारणं म्हणजे कायद्यालाच आव्हान देण्यासारखं आहे, असं सांगत ठाकरे सरकार दिशाहीन झालंय, अशी घणाघाती टीका हंसराज अहिर यांनी केली आहे.

ठाकरे सरकार दिशाहीन झालंय. तसेच आचार आणि विचार न करणारं हे सरकार आहे, अशी टीका हंसराज अहिर यांनी केलीआहे. ते दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाने महाराष्ट्रात तपास करण्यासाठी सीबीआयला दिलेली सर्वसाधारण परवानगी मागे घेतली आहे. त्यामुळे यापुढे सीबीआयला कोणत्याही प्रकरणी महाराष्ट्रात तपास करण्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून सीबीआयला महाराष्ट्रात नो एंट्री- अनिल देशमुख

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले…

“बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल”

अजित पवारांना कोरोनाची लक्षणं, क्वारंटाइन होण्याचा घेतला निर्णय!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या