अकोला | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या गुुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका मांडली होती. भोंगे उतरवले नाही तर आम्ही हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे.
राज ठाकरे हे दंगली भडकविण्याचे काम करत आहेत. समान नागरी कायदा अपेक्षित होता आहे, हा समान नागरी कायदा नेमका कशासाठी आहे हे त्यांनी एकदा वाचून यावे. प्रसिद्धीसाठी पोकळ घोषणा करता यातून काहीच हाती लागणार नाही. तुम्ही संभाजीनगरला जा, अयोध्येला जा, श्रीरामाचे दर्शन घेताना आत्मियतेने दर्शन घ्या, असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.
दर्शन घेताना चेहऱ्यावर सात्विक भाव ठेवा. हनुमान चालिसाच्या दोन ओळी तुम्हाला म्हणता येत नाहीत, असा जोरदार टोला अमोल मिटकरींनी लगावला आहे. राज्यावर गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकट आहे. आता कुठे राज्य आर्थिक संकटातून बाहेर पडत आहे. सर्वसामान्य हिंदू आणि सर्वसामान्य मुस्लीम यांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न आहेत, असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.
दरम्यान, भोंंगे वाटणे, तलवारी घेणे, तलवारी वाटणे हे आमचे प्रश्न नाहीत. राज्याला फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची परंपरा लाभली आहे. देशाला बाबासाहेबांनी संविधान दिले आहे. कायद्याचे राज्य आहे, कायद्याने राज्य चालते. हिंदू मुस्लिमांना शिक्षणाचे , बेरोजगारीचे दरवाढीचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“गुणरत्न सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्याला ‘इतक्या’ लाखांचं बक्षिस”
Raj Thackeray | ‘3 तारखेनंतर भोंगे हटवले नाहीत तर…’; राज ठाकरेंचा इशारा
पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा
धक्कादायक ! भर उन्हात लग्नात डान्स केल्यानं तरुणाचा मृत्यू
18 ते 20 एप्रिल दरम्यान ‘या’ भागात उष्णतेचा कहर, वाचा हवामान खात्याचा इशारा
Comments are closed.