बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…यांचं वागणं बघून हनुमानानेही कपाळावर हात मारून घेतला असेल”

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलण्याच्या खासशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. सभेत भाषण करताना अजित पवार जोरदार फटकेबाजी करत लोकांना खळखळून हसवतात. हनुमान जन्मस्थळावरून महंतामध्ये वाद पेटला होता. साधू महंत एकमेकांच्या अंगावर धावून गेले अन् माईकही फेकला होता. त्यावरून अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.

साधू, महंतांचा स्वभाव हा शांत असतो. महंतांनी गप्प बसावं तर हे माईक घेऊन एकमेकांना मारताहेत आणि आपण त्यांना महाराज, महंत म्हणतो. यांचा हा राडा आणि वागणं पाहून हनुमानानेही डोक्याला हात मारून घेतला असेल अरे हा काय प्रकार आहे, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

महंत महंत म्हणता आणि माईक घेऊन मारायला उठताय, अशी फटकेबाजी अजित पवारांनी केली आहे. अजित पवार यांनी यावेळी बोलताना राणा दाम्पत्याला देखील टोला लगावला आहे. काही व्यक्ती, संस्था आणि  संघटनांकडून जाती धर्माच्या नावावर विष पेरण्याचं काम सुरू आहे, अशी टीका अजित पवारांनी केली आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. कोणीही उठायचं, कुठही जायचं आणि हनुमान चालीसा म्हणायचं. मी जर म्हणालो भोसरीत जाऊन अजित गव्हाणेंच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणणात तर चालेल का?, असा खोचक सवाल अजित पवारांनी केला. कोणालाही आपल्या कृतीमुळे त्रास होता कामा नये, असं अजित पवारांनी सुनावलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

विधान परिषदेच्या उमेदवारी संदर्भात पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

“मी आता वयाच्या 85 व्या वर्षात आंदोलन करायचं का?”

काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर जोरदार टीका; म्हणाले…

महाविकास आघाडीत नाराजीचा सूर; ‘या’ नेत्याचे शिवसेनेवर गंभीर आरोप

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More