बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक बातमी! देशात नव्या कोरोना रुग्णांमध्ये 25 हजारांनी घट, तर कोरोनाबळीही 2800च्या खाली

नवी दिल्ली | कोरोना विषाणूने वर्षभरापूर्वीपासून देशात अक्षरश: थैमान घातलं आहे. कोरोनामुळे बळी जाणाऱ्या रुग्णांचे आकडे धडकी भरवणारे आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. देशांतर्गत रविवारी सापडलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येच्या तुलनेत सोमवारी 25 हजारांनी घट झाली आहे.

सोमवारी देशांतर्गत 1 लाख 27 हजार 510 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 795 कोरोनाग्रस्तांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनामुळे प्राण गमावलेल्या रुग्णांचा आकडा देखील रविवारच्या तुलनेत 2 हजार 800ने घटला आहे.

नवीन कोरोना बाधितांच्या घटणाऱ्या आकड्यांसोबतच कोरोनाबळींची संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच काल दिवसभरात देशात 2 लाख 55 हजार 287 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. या आठवड्यात भारतात कोरोनाची दुसरी लाट मंदावली असल्याचं मत अभ्यासक व्यक्त करत आहेत.

भारतात आत्तापर्यंत एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 81 लाख 75 हजार 44च्या पार गेला आहे. तर 3 लाख 31 हजार 895 कोरोना रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तसेच 2 कोटी 59 लाख 47 हजार 629 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 8 लाख 95 हजार 520  कोरोना रुग्ण सक्रीय आहेत. नुकतंच आरोग्य मंत्रालयाने लसीकरण झालेल्या नागरिकांबद्दल देखील माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 21 कोटी 60 लाख 46 हजार 638 नागरिकांंचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक

सकारात्मक बातमी: वय 92, HRCT स्कोअर 12, त्यात मूत्रपिंडाला सूज; तरीही कोरोनावर मात!

“…तर आज देशात एवढ्या जणांचा मृत्यू झाला नसता”

‘पक्षीय अजेंडा आवरून ही देशाला सावरण्याची वेळ’; रोहित पवारांचा मोदी सरकारला सल्ला

‘मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कुच करा’; खासदार संभाजीराजेंचा कार्यकर्त्यांना आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More