मुंबई | जेव्हा केव्हा क्रिकेटचा इतिहास वाचला जाईल तेव्हा क्रिकेटचा देव म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावाचा उल्लेख केला जाईल. सचिननं आपल्या खेळानं पिढीला प्रेरणा दिली आहे. गाव, वस्ती, तांड्यावरील पोरांना देखील सचिन बनावं वाटतं. त्या सचिनचा वाढदिवस म्हटल्यावर जगभरातून शुभेच्छा तर येणारच की.
सचिनला शुभेच्छा देताना त्याचा मुंबई इंडियन्सने एक छान आणि भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला प्रचंड मोठ्या प्रमाणात लाईक केलं जात आहे. सचिन तेंडूलकर आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. अशावेळी या वाढदिवसाला स्पेशल बनवण्याचा प्रयत्न अर्जूननं केला आहे.
माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा, माझ्या आयुष्यात माझ्यासाठी तुम्ही जे काही केलं त्याबद्दल आभार, तुमच्या दिवसाचा आनंद घ्या, अशा प्रकारच्या शुभेच्छा अर्जून तेंडूलकरनं दिल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना मुंबई इंडियन्सनं त्यानं सर्वांना क्रिकेट पाहण्यासाठी प्रेरणा दिली, असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, जागतिक क्रिकेटवर 20 हून अधिक काळ अधिराज्य गाजवणारा सचिन सध्या मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफचा भाग आहे. मुंबई सचिनला विजयाची गिफ्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे.
पाहा व्हिडीओ-
“He inspired all of 🇮🇳 to watch cricket.” 💙
The boys wish & share their experience of meeting 𝗦𝗮𝗰𝗵𝗶𝗻 for the first time on his special day 🥳 pic.twitter.com/JQ9wquIPZW
— Mumbai Indians (@mipaltan) April 24, 2022
थोडक्यात बातम्या –
“…नाहीतर उद्या कुणीही सुरक्षित राहणार नाही”
“कोण हा फडतूस रवी राणा?, प्रश्न जर सुटणार असतील तर नरेंद्र मोदींच्या…”
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी?, देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…
मोठी बातमी! किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप, म्हणाले…
रोंगाली बिहू कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा जलवा, पारंपारिक वाद्य वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल
Comments are closed.