बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शालूकडून नवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा, पाहा राजेश्वरी खरातचा गोजीरवाणा अंदाज

मुंबई | 07 ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सव सुरु झाला आहे. नवरात्र म्हटलं की स्त्रिया रोज वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसतात. प्रत्येक दिवसाचा रंग ठरलेला असतो. अशातच यावर्षी पहिल्या दिवसाचा रंग पिवळा आहे. त्यातच सर्वांची लाडकी शालू अर्थात राजेश्वरी खरात हिने पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये फोटो शेअर करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फँड्री या चित्रपटातून शालू अर्थात राजेश्वरी प्रचंड प्रसिद्धीस आली. या चित्रपटात तिचा अगदी सौज्वळ असा अंदाज होता. मात्र चित्रपटानंतर राजेश्वरीने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला.

राजेश्वरी खरात तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रचंड सक्रीय असते. ती वेगवेगळ्या लुक्समध्ये तिचे सतत फोटो शेअर करत असते. अशातच तिचा नवरात्रौैत्सवाच्या पहिल्याच दिवशीचा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.

नुकतेच शेअर केलेल्या फोटोंमध्ये शालूने पिवळ्या रंगाची सहावारी साडी नेसली आहे. त्यावर तिने अतिशय पारंपारिक पद्धतीचे दागिणे देखील परिधान केले आहेत. हा फोटो शेअर करत तिने सर्वांना नवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत.

राजेश्वरीच्या या मराठमोळ्या अंदाजाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मोठ्या प्रमाणात तिच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या असून तिच्या या फोटोंवर 13 हजारपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत.

थोडक्यात बातम्या-

आयकर विभागाच्या छाप्यानंतर जयंत पाटलांनी केली अजित पवारांची पाठराखण, म्हणाले…

आर्यन खानसोबत दिसलेल्या ‘या’ भाजप नेत्याचं स्पष्टीकरण, म्हणाले…

…म्हणून स्वप्निल जोशी म्हणतो; आम्हा कलाकारांना अकला नाहीत!

मोठी बातमी! पवारांशी संबंधित कारखाने आणि संचालकांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी

‘येत्या 8 दिवसांमध्ये अटक केली नाही तर…’, राकेश टिकैत यांचा योगी सरकारला इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More