Top News विदेश

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांच्याकडून नवरात्रीच्या शुभेच्छा!

बोस्टन | अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बायडेन हे रिंगणात उतरले आहेत. निवडणूकीचा प्रचार जोरदार सुरु असून बायडेन यांनी नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्यात.

यासंदर्भात जो बायडेन यांनी ट्विट केलंय. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “नवरात्री हा हिंदू सण सुरु झालाय. अमेरिका आणि जगभरात नवरात्रीचा सण साजरा करणाऱ्या सर्वांना जील आणि माझ्याकडून शुभेच्छा.”

पुन्हा एकदा चांगल्याचा वाईटावर भव्य विजय होईल. शिवाय एक चांगली सुरुवात होईल आणि सर्वांना संधी मिळेल, असंही बायडेन म्हणालेत. यापूर्वी बायडेन यांनी गणेश चतुर्थीच्या देखील शुभेच्छा दिल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीसांचं बिहारमधून उद्धव ठाकरेंना पत्र; केली ‘ही’ मागणी

दसऱ्याच्या मुहूर्तावर जिम सुरु होणार; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी भागाच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांची घेणार भेट

राहुल गांधी म्हणतात, देशातील गरीब भुकेला आहे कारण…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या