शिक्षक दिनानिमित्त आपल्या गुरूंना द्या खास शुभेच्छा; शिक्षक होतील खूश

Happy Teacher’s Day 2024 l दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिन अशा लोकांना समर्पित आहे जे शिक्षण आणि ज्ञान प्राप्त करण्यात मदत करतात. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात एका शिक्षकाच्या सन्मानार्थ झाली, ज्यांचे नाव आहे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती राहिले आहेत.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक :

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.ते त्यांच्या विद्यार्थ्यांचे सर्वात आवडते शिक्षक असायचे. अशा परिस्थितीत त्यांच्या काही माजी विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. 5 सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आहे आणि तेव्हापासून आजतागायत हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

डॉ.राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिक्षक या प्रतिष्ठित पदाचा मान वाढवण्यासाठी अनेक कल्पना दिल्या. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे अनमोल विचार जीवनात अंगीकारल्यास शिक्षणाचे महत्त्व समजू शकते आणि या दिशेने प्रोत्साहन मिळू शकते. तर या दिनानिमित्त तुमच्या शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी तुम्ही देखील त्यांना आवडतील असे संदेश, कोट्स पाठवू शकता.

Happy Teacher’s Day 2024 l शिक्षक दिनानिमित सुंदर संदेश :

शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत
नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या
सर्व शिक्षकांना शत शत नमन!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपण केवळ आमचे शिक्षक नाही
आपण आमचे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहात
सर्व एका व्यक्तीमध्ये आकार घेतलेले
तुमच्या पाठिंब्याबद्दल नेहमी आभारी राहू
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.

गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!

माझे आईवडिल, नातेवाईक, गुरुजन,
बालपण पासून ते आजपर्यंतचा मित्रपरिवार
आणि ज्ञात अज्ञातपणे
मला काही ना काही शिकवून गेले,
अश्या सर्व शिक्षकांना वंदन…

आयुष्याला आकार,आधार आणि
अमर्याद ज्ञान देणारे प्रत्येक
गुरुवर्यास शतशः नमन…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

शि म्हणजे शीलवान
क्ष म्हणजे क्षमाशील
क म्हणजे कर्तव्येनिष्ठ
अशा सर्वच शिक्षकांना वंदन
शिक्षकदिनांचा हार्दिक शुभेच्छा

News Title : Happy Teacher’s Day 2024

महत्वाच्या बातम्या-

सॅमसंग कंपनीने लाँच केला स्वस्तात मस्त फोन; जाणून घ्या किंमत

गुड न्यूज! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?, समोर आली मोठी अपडेट

अजित पवार कुणाला करणार आमदार?, विधान परिषदेसाठी ‘या’ 3 नावांची चर्चा

खबरदार… विसर्जनानंतर बाप्पाचे फोटो काढाल तर पस्तावाल, पोलिसांचे आदेश काय ?

“काढणीला आलेलं पीक गेलं, सरकारने आता लाडका शेतकरी..”; राज ठाकरेंचं आवाहन