बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विठू-रखुमाई आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास

पुणे | अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विठू-रखुमाई आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास घालण्यात आली आहे. पंढरपूरचं विठ्ठल रखुमाई मंदिर आणि पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरही आज अक्षय तृतीयेनिमित्त खास सजवलं आहे. या मंदिरातील दृश्य अत्यंत विलोभनीय आहेत.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेदिवशी पंढरपुरातील विठ्ठल रुखुमाई मातेच्या गाभाऱ्याला आमराईचं स्वरुप आलं आहे.

पंढरपूरात आज  विठूमाऊली आणि रखुमाईच्या गाभाऱ्याला हापूस आंब्याची आरास केली आहे.

सावळा विठ्ठल आज आमराईत असल्याचं दिसत आहे. प्रत्येक सणानिमित्त विठूमाऊली आणि रखुमाईच्या गाभाऱ्याला फुलांची सजावट केली जाते.

पण, आज फुलांची नाही तर आंब्यांची सजावट करण्यात आली आहे. सध्या आंब्याचे दिवस असल्यानं सजावट करण्यासाठी आंब्याचा उपयोग केला आहे.

विठ्ठलाबरोबरच रखुमाईचा गाभाराही आंब्याच्या सजावटीमध्ये सजावट करण्यात आली आहे. रखुमाई यात खुलून दिसत आहे.

पुणे येथील विठ्ठलाचे भक्त विनायकशेठ काची बुंदेले यांच्याकडून ही आरास करण्यात आली. तर संपूर्ण सजावट किसन सिताराम आणि ब्रदर्स पुणे यांनी साकारली आहे.

विठू-रखुमाई मंदिरात केलेली ही सजावट पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य भाविक याठिकाणी दाखल होतात, पण यावर्षी कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यंदा भाविकांना घरातूनच दर्शन घ्यावं लागत आहे.

पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरही आज अक्षय्य तृतीयेनिमित्त खास सजलं आहे. देवस्थानं बंद आहेत. पण काही मंदिरांमध्ये पूजा, आरास अशा विधी सुरू आहे.

पुण्यातील पुणेकरांचे लाडके दैवत असलेल्या दगडुशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली. दरवर्षी ही आरास केली जाते.

यावर्षी साध्या पध्दतीने अक्षय्य तृतीया मंदिरात साजरी केली जात आहे. दुसऱ्या दिवशी हे आंबे प्रसाद म्हणुन ससुन रुग्णालयात रुग्णांना दिले जातात.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अक्षय्य तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

थोडक्यात बातम्या-

लजास्पद! ऑक्सिजनसाठी सेक्सची मागणी; सोशल मीडियावर संतापाची लाट

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट, पण मृतांचा आकडा चिंताजनक

लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदी जबाबदार; लसीकरणावरून असदुद्दीन ओवेसी यांची टीका, म्हणाले…

ऐकावं ते नवलच! फॅार्च्युनर गाडीतून वांग्यांची विक्री, पाहा व्हायरल व्हिडीओ-

“गाय मालकावर नाराज झाली, तरी ती खाटीकाच्या घरी जात नाही; आम्ही मोदींसोबत आहोत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More