बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हरभजन आणि पाकिस्तानी खेळाडूचं या मुद्द्यावरून रंगलं ट्विटर वॉर

नवी दिल्ली | टी-20 विश्वचषकातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा पराभव झाला. त्यामुळे तब्बल 12 वर्षानंतर पाकिस्तानला भारतीय संघाविरोधात विजय मिळाला आहे. या ऐतिहासिक विजयामुळे पाकिस्तानी जनतेसह खेळाडूंही अतिशय आनंदात आहेत. या सामन्यानंतर अनेकदा सोशल मीडियावर भारतीय चाहते आणि पाकिस्तानी चाहते यांच्यात वाद रंगल्याचं पाहायला मिळालं होतं.

मात्र आता दोन खेळांडूमध्येही या मुद्द्यावरून ट्विटर युद्ध पेटल्याचं पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद आमिर आणि हरभजन सिंग यांच्यात हा वाद पेटला आहे. सुरूवातीला आमिरने शाहीद आफ्रिदीने हरभजनच्या बॉलवर सिक्सर मारल्याचा एक जुना व्हिडीओ ट्विट केला आहे. ज्यामध्ये त्याने हरभजनची खिल्ली उडवली आहे.


त्यानंतर हरभजनने त्यावर उत्तर देताना आमिरला स्पाॅट फिक्सींगवरून प्रश्न विचारून त्याला चांगलंच सुनावलं आहे. हरभजनने ट्विटमध्ये म्हटलं आहे.”लॉर्ड्समध्ये नो बॉल कसा असू शकतो? कोणी किती घेतले? कसोटी सामन्यात नो बॉल कसा असू शकतो?” असा प्रश्न विचारला आहे? त्याचबरोबर “पाकिस्तानी खेळाडूंना लाज वाट नाही का?” असंही म्हटलं आहे.

त्यानंतर भज्जीने एक भन्नाट व्हिडीओ ट्विट केला आहे. ज्यामध्ये त्याने मोहम्मद आमिरच्या बॉलवर सिक्सर ठोकून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. शिवाय सिक्सर को फिक्सर असं कॅप्शनही हरभजनने या ट्विटला दिलं आहे. हरभजनने अजूनही काही व्हिडीओज शेअर केले आहेत. ट्विटरवर बराच वेळ हरभजन आणि आमिर यांच्यातील वाद सुरू होता.

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांनो आता सातबारा काढा घरच्या घरी आपल्या मोबाईलमध्ये; कसं ते वाचा सविस्तर

समीर वानखेडेंचा आणखी एक जुना फोटो शेअर करत मलिक म्हणतात, मला तर…

“आर्यन खानला फसवण्यात आलं असून, समीर वानखेडेंची नोकरी जाणार”

समीर वानखेडेंवर पाळत ठेवण्यात येत असल्याच्या आरोपावर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

दिवाळीसंदर्भातील नियमावली जाहीर; ‘या’ नियमांचं करावं लागणार पालन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More