बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांच्या मदतीसाठी धावला हरभजन सिंग, केली ‘ही’ लाखमोलाची मदत

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने मोठी हानी होत आहे. या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. त्यामुळे काही बडे राजकीय नेते, अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते आपापल्या परीने मदत करताना दिसत आहे. पुण्यातही कोरोनाने थैमान घातलेलं पाहायला मिळत आहे. अशातच पुणेकरांसाठी भारताचा फीरकीपटू हरभजन सिंहने लाख मोलाची मदत केली आहे.

कोरोना रूग्णांची चाचणी करताना दोन प्रकारच्या चाचण्या करतात. याध्ये रॅपिड टेस्ट आणि दुसरी आरटीपीसीआर ही होय. हरभजनने या चाचण्या करण्यासाठी मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिली आहे.  ही व्हॅन पुण्यात 24 तासासाठी उपलब्ध असणार आहे. या सुवधेचं उद्घाटन हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे.

संपूर्ण देशामध्ये कोरोनाने थैमान घातले असताना महाराष्ट्रात देखील रोज लाखो रूग्ण या आजाराच्या विळख्यात येत आहेत. पुणे शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा हा वाढत्या आलेखाप्रमाणे वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिक आपली चाचणी करत आहेत. मात्र शासकीय रूग्णालयांमध्ये एक दिवसाला 100 कीट मिळत असल्यामुळे नागरिकांना चाचणीसाठी खासजी दवाखान्यांमध्ये जावं लागत आहे. मात्र हरभजनने केलेल्या मदतीमुळे पुणेकरांना त्याचा फायदा होईल.

दरम्यान, आयपीएलमधील कोलकाता संघातील अष्टपैलू परदेशी खेळाडू पॅट कमिन्सने भारतातील कोरोनाची स्थिती पाहता मदत करण्याचा निर्णय घेतला. पॅट कमिन्सने 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास 30 लाख रुपयांची मदत पीएम केअर फंडाला दान केले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! सुजय विखेंनी विमानाने आणलेले रेमडेसिविर ताब्यात घेण्याचे न्यायालयाचे आदेश

“आयपीएल खेळणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनो… तुम्हीही भारताला मदत करा”

“आता लोकांनी घरातही मास्क घालण्याची वेळ आली आहे”

रक्ताच्या नात्यानेच फिरवली पाठ! आईला कोरोना झाल्यामुळे मुलाने…

धक्कादायक! पत्नीचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने पतीने केलं माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More