बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोहम्मद आमीरची इतकी औकात नाही की, मी त्याच्याबद्दल बोलावं”

नवी दिल्ली | भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद अमिर यांच्यातील वाद अजूनही थांबलेला नाही. भारत-पाकिस्तानचा सामना संपल्यानंतर मोहम्मद अमिरने ट्विटवर हरभजन सिंगला डिचवलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये ट्विटर वाॅर चांगलचं रंगलं आहे. अशातच आता मोहम्मद आमीरला हरभजन सिंगने कठोर शब्दात सुनावलं आहे.

जर मी दलदलीत उतरलो तर माझ्यावर देखील चिखल उडेल. त्यामुळे मी त्याठिकाणी जाणार नाही. मोहम्मद आमीरची इतकी औकात नाही की मी त्याच्याबाबत बोलावं. जितकं जास्त मी त्याच्याबाबत बोलेन तितका माझाच अपमान होईल, असं मी समजतो, असंही हरभजनने सांगितलं आहे.

मला त्याच्याशी बोलायचं नाही. तो एक कलंक आहे. त्यानं जागतिक क्रिकेटला ज्या पद्धतीने कलंक फासला आहे, ते कुणीच कधीही विसरू शकत नाही. ज्या व्यक्तीने क्रिकेटला विकलं, आपला देश, आपला इमान आणि आत्मसन्मानाची बोली लावली, त्याच्याबद्दल मी काय बोलायचं. मी खरंतर त्याच्या ट्विटरला उत्तर देखील द्यायला नको होतं. कारण तो मुर्ख आहे, असंही हरभजनने म्हटलं आहे.

दरम्यान, शाहिद अफ्रिदीने हरभजनला कसोटी सामन्यात 4 चेंडूंत 4 षटकार मारले होते. त्या सामन्याचा व्हिडीओ मोहम्मद आमीरने ट्विटवर अपलोड करत हरभजनला डिचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हरभजनने एकापाठोपाठ दोन ट्विट करत आमीरला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे त्यांच्यातील हा वाद अजूनही थांबलेला नाही.

थोडक्यात बातम्या-

दिवाळीआधी सोनं पुन्हा महागलं! वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

कॅरेबियन संघासाठी तारणहार धावला! ‘या’ दिग्गज अष्टपैलू खेळाडूची संघात एन्ट्री

गुंतवणूकदारांना मोठा फटका! सेनसेक्समध्ये सहा महिन्यातील सर्वात मोठी घसरण

‘जर गाडीत चहाचा थेंब जरी सांडला तर मी…’; गडकरींची कंत्राटदारांना तंबी

डाॅ. शरद पवार! शरद पवारांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ पदवी बहाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More