बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हरभजन सिंग ‘या’ चित्रपटातून करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण!

मुंबई | दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंगनं आपल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. हरभजन सिंग गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. तो लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर आता रुपेरी पडद्यावर झळकणार म्हणल्यावर हरभजन सिंगचे चाहते खूपच उत्सुक झाले आहेत.

‘फ्रेंडशिप’ या तामिळ चित्रपटाद्वारे हरभजन सिंग अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यानं ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत असल्याची घोषणा केली. हरभजन सिंग आणि लोसलिया यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एक संपूर्ण मनोरंजन पॅकेज असणार आहे. निर्मात्यांनी सिंग आणि त्याच्या मित्रांसोबत एक आकर्षक पोस्टर आणि लिरिकल व्हिडीओ शेयर करून या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

चित्रपटाची निर्मिती किरण रेड्डी मंडाडी आणि राम माद्दुकुरी यांनी केली असून ‘फ्रेंडशिप’ यावर्षी हिंदी, तेलगू आणि तामिळ भाषेत रिलीज होणार आहे. गेल्या वर्षी 7 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

दरम्यान, हरभजन सिंग यापूर्वीही काही चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत झळकला आहे. मात्र आता तो मूख्य भूमिकेत दिसणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘गंदी बात’ फेम प्रसिद्ध गहनाला ह्रदय विकाराचा झटका, नुकताच झाला होता जामीन

भाजपचे निलंबित 12 आमदार आज घेणार राज्यपालांची भेट; राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

‘आरएसएस प्रमुख म्हणजे मुंह में राम, बगल में छुरी आहेत’; मोहन भागवतांच्या वक्तव्यावर मायावती भडकल्या

अबब… रिंकू राजगुरु उर्फ आर्चीने दाखवली तिची जोरदार फिगर, पाहा फोटो

‘आमदारकी गेली तरी चालेल पण…’; निलंबित आमदार आमदार राम सातपुतेंचा सरकारवर घणाघात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More