काय दिवस आलेत?; युवराज आणि हरभजनला पंजाबच्या संघातूनही वगळलं

मोहाली | भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवलेल्या युवराज सिंग आणि हरभजन सिंगवर काय दिवस आलेत?, असं म्हणण्याची वेळ आली आहे. भारतीय संघानंतर त्यांना पंजाबच्या रणजी संघातून देखील वगळण्यात आलं आहे. 

युवराज आणि हरभजन भारतीय संघात पुनरागमन करण्याची आस लावून बसले आहेत, मात्र त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागताना दिसत आहे. 1 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या रणजी मालिकेत सुद्धा दोघं खेळताना दिसणार नाहीत. 

रणजी ट्रॉफीसाठी पंजाबच्या संघाची घोषणा करण्यात आलीय. मनदीप सिंगकडे पंजाबच्या संघाचं नेतृत्व सोपवलंय. 

दरम्यान, युवा खेळाडूंना संधी द्या, असं काही दिवसांपूर्वी युवराज म्हणाला होता, तसेच हरभजन विजय हजारे ट्रॉफी खेळला नव्हता त्यामुळे दोघांना वगळण्यात आल्याचं कळतंय. 

महत्त्वाच्या बातम्या-

-काँग्रेस- शिवसेनेच्या आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की!

-दिवाळीआधीच रोहित-रायुडूची आतषबाजी; वेस्ट इंडिजपुढे 378 धावांचं आव्हान

-हिंमत असेल तर राम मंदिराचा अध्यादेश आणून दाखवाच- असदुद्दीन ओवेसी

-रोहितची शतकी खेळी; तर रायुडूचंही अर्धशतक

-गरज पडल्यास मातोश्रीवर जाईन, त्यामध्ये कमीपणा नाही- देेवेंद्र फडणवीस

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या