बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणतात…

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासुन इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेताकुटीला आला असून इंधन दरवाढ थांबवण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्याच पार्श्वभुमीवर आता पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणण्याच्या मागणीने सध्या चांगलाच जोर धरला आहे. कारण आतापर्यंतचे इंधनाचे सर्वोच्च दर सध्या भारतात पाहायला मिळत आहेत आणि त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे.

साधारण 35 रुपये एवढी मूळ किंमत असलेल्या पेट्रोलवर केंद्र आणि राज्य एकत्रित मिळून 70 रुपयांहुन अधिक पैसे कर स्वरूपात लावतात. साधारण इंधनाच्या किंमतीपेक्षा दुप्पट कर लावण्यात येत असल्याने त्या करातून मुक्त होण्यासाठी जीएसटीच्या कक्षेत पेट्रोल आणि डिझेलला आणण्याची मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

यासंबंधी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंह पुरी यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत पेट्रोल आणि डिझेल आणण्यासाठी वस्तू आणि सेवा कर परिषद म्हणजेच जीएसटी काउंसिलकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, तसेच प्रत्येक राज्यात स्वतंत्र व्हॅट आणि इतर स्थानिक कर लागतात, त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वेगवेगळ्या राज्यात तफावत असल्याचं त्यांनी बोलुन दाखवलं.

जीएसटी काउंसिलकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, तो प्रस्ताव आल्यानंतर यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंह पुरी यांनी दिली आहे. त्यामुळे तुर्तास तरी इंधन दरवाढ थांबणार नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात सरकार यावर नेमके काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील – राजेश टोपे

खासगी शाळांची फी 15 टक्क्यांनी कमी होणार?, राज्य सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

केबीसीमध्ये लखपती झालेल्या डॉ. दीपा शर्माचा दरड दुर्घटनेत मृत्यु

“राणे केंद्रीय मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, राणेच पांढऱ्या पायाचे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More