खेळ

हार्दिक पांड्या झाला बाबा; फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

मुंबई | भारतीय क्रिकेट टीमचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाबा झाला आहे. हार्दिकची पत्नी नताशा हिने मुलाला जन्म दिला आहे. हार्दिकने स्वतः फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच यांना पुत्ररत्न झालाय. हार्दिक-नताशा आई-बाबा झाल्याचं हार्दिकने ट्विटवरून सांगितलं. लॉकडाऊन काळात हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. त्यानंतर हार्दिकने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट केले होते.

2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यानं बॉलिवूड नताशा यांनी साखरपुडा केला होता. मुख्य म्हणजे याबाबत हार्दिकच्या घरच्यांनाही माहिती नव्हती. हार्दिक आणि नताशा यांनी वर्षाच्या सुरुवातीला दुबईत मोजक्याच मित्रांच्या साक्षीनं साखरपुडा केला.

मुंबईत एका पार्टीमध्ये हार्दिक आणि नताशा या दोघांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं. नताशानं बॉलिवूडमधील काही चित्रपटांत काम केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीच्या आमदारानं शिवसेना नगरसेवक फोडले; सिन्नरमध्ये ‘पारनेर’ची पुनरावृत्ती!

अयोध्येत बुध्दविहार व्हावं, त्यासाठी आंबेडकरी नेत्यांनी लढा देणं गरजेचं- गायक आनंद शिंदे

…हीच भगवान रामाची खरी पूजा ठरेल- अरविंद केजरीवाल

नागपुरात हृदयद्रावक घटना; कोरोनाग्रस्त मातेचा मृत्यू, बाळ मात्र सुरक्षित

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या