बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टी-20 वर्ल्ड कपसाठी हार्दिक पांड्याला डच्चू??? ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआयची नजर

मुंबई | आयपीएलचा थरार संपल्यानंतर 17 ऑक्टोबरपासून टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 15 खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. मात्र विश्वचषकाआधी काही भारतीय खेळाडूंच्या तंदुरूस्तीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा नाव आघाडीवर आहे.

आयपीएल संपल्यानंतर लगेचच भारतीय संघ विश्वचषक खेळणार आहे. भारताकडे विश्वचषकासाठी अंतिम 15 सदस्य खेळाडूंची नावे पाठवण्याचा अजूनही कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे यामधून हार्दिक पांड्याला डच्चू मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये एकही षटक टाकलं नाही. तसेच त्याच्या बॅॅटदेखील गोलंदाजांवर तळपली नाही. त्यामुळे आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी हार्दिक पांड्याच्या जागी अनेक भारतीय खेळांडूची नावे चर्चेत आहेत.

विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याच्या जागीचं नाव आघाडीवर आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळताना शार्दूलने आपल्या अष्टपैलू खेळीने सगळयानांच अचंबित करून टाकलं आहे. शार्दूल ठाकूरनंतर दीपक चहरला पसंती मिळू शकते. कारण दीपक चहरने श्रीलंका दौऱ्यावेळी आपल्या अष्टपैलू खेळीचा नजराणा पेश केला होता.

दरम्यान, शार्दूल ठाकूर आणि दीपक चहरनंतर विश्वचषक स्पर्धेत आयपीएलमध्ये पर्पल कॅप होल्डर गोलंदाज हर्षल पटेलची वर्णी लागू शकते. हर्षल पटेल आपल्या गोलंदाजीचा करिष्मा आयपीएलमध्ये सगळ्यांनाच दाखवला आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 30 बळी टिपले आहे. त्यामुळे भारतीय संघात जर हार्दिक पांड्याला डच्चू मिळाला तर कोणाची वर्णी लागणार ते आता पहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

”नेतेगिरी म्हणजे लुटणं नाही, फॉर्च्युनरने चिरडण्यासाठी मी राजकारणात आलो नाही”

“त्याचं आडनाव ‘खान’ असल्यानं त्याला त्रास दिला जातोय”

“अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी”

‘लखीमपूर घटनेवर मोदी-शहा गप्प का?’, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

‘बिग बाॅसच्या घरात गेले ही माझी चूक होती, मात्र…’- शिवलीला पाटील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More