बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईसाठी एकहाती सामने जिंकणाऱ्या पांड्या बंधूंचा पत्ता कट; वाचा रिटेन खेळाडूंची यादी

मुंबई | भारतीय क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएल (IPl) ही क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय लीग (Most Populer Cricket League) आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग (Most Rich League) म्हणूनही आयपीएलचा गौरव होतो. परिणामी आपापल्या संघांना मजबूत करण्यावर सर्व संघ व्यवस्थापक भर देत असतात. अशातच आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असणारा मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) आपल्या रिटेन्शन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

मुंबई इंडियन्स संघ हा सर्वात संतुलीत संघ होता. परिणामी त्यांच्यासाठी फक्त चार खेळाडू निवडणे हे सर्वात जास्त कठीण काम होतं. अनेक प्रतिभावान खेळाडूमधून फक्त चार निवडताना संघ व्यवस्थापकांना आपल्या काही खास खेळाडूंना सोडावं लागलं आहे. मुंबई संघाला एकहाती सामना जिंकून देणारे हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांना मुंबई संघानं रिटेन केलं नाही.

आपल्या ताकदवान खेळीनं अनेकदा संघाला अडचणीतून पांड्या ब्रदर्सनी बाहेर काढलं आहे. इतकंच नाही तर हार्दिक पांड्या हा मुंबई संघासाठी ड्रीम प्लेयर होता. पण सध्या हार्दिक खराब फाॅर्मातून जात असल्यानं मुंबई संघाला त्याची गरज नसल्याचं लक्षात येत आहे. फक्त पांड्याच नाही तर मुंबई संघासाठी मधल्या फळीत वेगवान खेळी करणारा ईशान किशन हा देखील सघाचा भाग नसणार आहे.

दरम्यान, बीसीसीआयच्या नियमावलीनूसार प्रत्येक संघाला केवळ चार खेळाडू रिटेन करता येणार आहेत. परिणामी त्या त्या संघाच्या चाहत्यांना मोठे धक्के सहन करावे लागत आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) : एम. एस. धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली.

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) : सुनील नरिने, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर.

सनरायझर्स हैदराबाद (SRH) : केन विल्यमसन

मुंबई इंडियन्स (MI) : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) : विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल.

दिल्ली कॅपिटल्स (DC) : ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, एनरिच नॉर्किया.

राजस्थान रॉयल्स (RR) : संजू सॅमसन

थोडक्यात बातम्या 

‘किती लोकांना भरपाई देण्यात आली त्याची माहिती दिली नाही’; सर्वोच्च न्यायालयाने ९ राज्यांना झापलं

लगीन घाई बरी नाही! नवरा-नवरीच्या फजितीचा व्हिडीओ तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

ओमिक्रॉन विषाणूने जगाचं टेन्शन वाढवलं, रूग्णसंख्येबाबत धक्कादायक माहिती समोर

मोठी बातमी! गोव्यात काॅंग्रेसचा भाजप आणि टीएमसीला जोर का झटका

सरकारची मोठी घोषणा; मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More