IPL मधील अपयशानंतर हार्दिकच्या वैवाहिक आयुष्यात वादळ?; लवकरच घेणार घटस्फोट?

Hardik Pandya | क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासाठी यावर्षीचा आयपीएल हंगाम खूपच वाईट ठरला. हार्दिकची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी वर्णी लावण्यात आली. रोहितचं कर्णधारपद काढल्याने चाहत्यांनी हार्दिकला अगदी अखरेच्या सामन्यापर्यंत ट्रोल केलं. त्यात मुंबईची कामगिरी अत्यंत निराशादायक होती.

आयपीएलमधील अपयशानंतर हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्यातही संकट आल्याचं म्हटलं जातंय. हार्दिकच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याची जोरदार चर्चा आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोव्हिक यांच्यात बिनसल्याची चर्चा आहे.

हार्दिक पांड्या पत्नी नताशाला घटस्फोट देणार?

इतकंच नाही तर, लवकरच हार्दिक आणि नताशा एकमेकांपासून वेगळं होत घटस्फोट घेणार असल्याचं देखील म्हटलं जातंय. गेल्या काही दिवासांपासून नताशा चर्चेत आहे. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा हे बी-टाऊनचे लोकप्रिय जोडपे आहेत.त्यांनी 2020 मध्ये साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधली. यानंतर त्यांनी 2023 मध्ये भव्य लग्नसोहळा केला.

अशात एका रेड्डीट युझरने हार्दिक आणि नताशामध्ये काहीतरी बिनसलं असल्याची पोस्ट केलीये.  नताशाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून ‘पांड्या’ हे आडनाव काढून टाकले आहे. तसेच, युझरने सांगितले की, हार्दिकने 4 मार्च रोजी पत्नीच्या वाढदिवशी काहीही पोस्ट केली नव्हती. युझरने असाही दावा केला आहे की, नताशाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून हार्दिकसोबतचे (Hardik Pandya) काही फोटो हटवले आहेत.

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

पाहायला गेलं तर अद्याप हार्दिक आणि नताशा या दोघांनीही याबाबत अधिकृत असं काहीच सांगितलं नाहीये. त्यातच नताशाच्या प्रोफाईलवर हार्दिकसोबतचे फोटो देखील उपलब्ध आहेत, परंतु ही पोस्ट रेड्डीटवर येताच नेटिझन्सनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

हार्दिकला (Hardik Pandya) आयपीएल 2024 मध्ये होत असलेल्या टीकेमुळे नताशाने असं केलं असावं, जेणेकरून त्यांच्या मुलाला याचा काही त्रास होणार नाही. असा आंदज नेटकरी लावत आहेत. तर काहींनी क्रिकेटपटूने पत्नीची फसवणूक केली का, असा प्रश्न केलाय. नताशा आयपीएलच्या कोणत्याही सामन्यात दिसली नाही, याचे एक कारण हार्दिकचे सतत होणारे ट्रोलिंग असू शकते.असंही एक जण म्हणाला. त्यामुळे सध्या हार्दिक आणि नताशा यांची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @natasastankovic__

News Title-  Hardik Pandya and Natasa Stankovic rumored to be getting divorced

महत्त्वाच्या बातम्या –

“लग्नापूर्वी वर्षभर..”, आमिर खानच्या एक्स पत्नीचा धक्कादायक खुलासा

पुणे अपघातप्रकरणी विशाल अग्रवालची धक्कादायक कबुली!

ऐश्वर्याच्या एक्स बॉयफ्रेंडचा अभिषेक बच्चनबाबत मोठा खुलासा!

“तरूण पिढी नारळ पाणी पिण्यासाठी जाते का?”, वसंत मोरे संतापले

दिनेश कार्तिकच्या पहिल्या बायकोने केले ‘या’ क्रिकेटरसोबत लग्न! जाणून घ्या इन साईड आणि आऊट साईड स्टोरी