Hardik Pandya and Natasha divorce | गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत होत्या. मात्र, दोघांनीही कधीच यावर अधिकृत असं भाष्य केलं नव्हतं. मात्र, काल रात्री सोशल मीडियावर पोस्ट करत या दोघांनी एकमेकांपासून वेगळं झाल्याची माहिती दिली आहे. अर्थात दोघांचा (Hardik Pandya and Natasha divorce) आता घटस्फोट झाला आहे.
नताशा आणि हार्दिक यांनी आपल्या सोशल मीडिया पेजवर याबाबत पोस्ट टाकून माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नताशा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हार्दिकसोबतचा कोणताही फोटो शेअर करत नव्हती.यामुळे दोघांमध्ये काहीही सुरळीत नसल्याचे स्पष्ट संकेत दिले जात होते. अखेर गुरुवारी (18 जुलै) रात्री हार्दिकने नताशासोबत घटस्फोटाच्या वृत्ताला सोशल मीडियातून दुजोरा दिला.
हार्दिक पांड्या आणि नताशा झाले वेगळे
आता घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याला त्याच्या कमाईतील 70 टक्के रक्कम नताशाला द्यावी लागू शकते, असं म्हटलं जातंय. हार्दिक पांड्याच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर (Hardik Pandya and Natasha divorce)कधीकाळी 200 रुपयांमध्ये टूर्नामेंट खेळणारा हार्दिक आज करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती 91 कोटी रुपये आहे. क्रिकेटशिवाय तो जाहिरातींमधूनही मोठी कमाई करतो.
मागे त्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता.यामध्ये त्याने सांगितले होते की, त्याचे घर आणि कार त्याच्या आईच्या नावावर आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक म्हणाला होता की, “माझ्या वडिलांच्या खात्यात आईचे नाव आहे, भावाच्या खात्यात आईचे नाव आहे आणि माझ्या खात्यातही आईचे नाव आहे. सर्व काही तिच्या नावावर आहे. कारपासून घरापर्यंत…सगळं तिच्या नावावर आहे.”
View this post on Instagram
अशी सुरू झाली हार्दिक-नताशाची लव्ह स्टोरी
नताशा स्टँकोव्हिचला ‘डीजे वाले बाबू’ म्युझिक व्हिडिओमुळे लोकप्रियता मिळाली होती. ती ‘बिग बॉस’ आणि ‘नच बलिये’ सारख्या रिॲलिटी शोचा भागही राहिली आहे. तिला तिच्या प्रोफेशनल जीवनात अभिनेत्री म्हणून फारशी प्रसिद्धी मिळाली नसली तरी ती तिच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत राहिली. 2020 मध्ये तिने क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत लग्न केले.
नताशा आणि हार्दिक दोघेही पहिल्यांदा 2018 मध्ये एका नाईट क्लबमध्ये भेटले होते. नताशा (Hardik Pandya and Natasha divorce) आणि हार्दिकचे अनेक कॉमन मित्र होते. 6 वर्षांपूर्वी हार्दिकने मुंबईत वाढदिवसाची पार्टी दिली होती. नताशाही या पार्टीत सामील झाली. इथेच दोघे पहिल्यांदा भेटले होते.
2018 मध्ये हार्दिक आणि नताशाच्या (Hardik Pandya and Natasha divorce)पहिल्या भेटीनंतर त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. पुढे हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी जानेवारी 2020 मध्ये साखरपुडा करत सर्वांनाच धक्का दिला. जुलै 2020 मध्ये त्यांच्या आयुष्यात अगस्त्य आला. हार्दिक आणि नताशा यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनी लग्न केले.
News Title: Hardik Pandya and Natasha divorce
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त; जाणून घ्या नवीन दर
आज ‘या’ राशींना सूर्यदेवाच्या कृपेने मोठा धनलाभ होणार!
“तुला लई प्रेम असेल तर देवेंद्र फडणवीसांसोबत लग्न कर”, मनोज जरांगेंचं प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर
अभिषेकने केला नवा खुलासा, म्हणाला ‘ज्याच्यावर ती प्रेम करते त्यासाठी…’
“जगलोच तर ॲब्यूलन्समध्ये जाईन पण…”; मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य