पिकॉक बॉलिंग टू डी कॉक, हार्दिकच्या हेअरस्टाईलनं हास्यकल्लोळ!

सेंच्युरिअन | दुसऱ्या वनडे सामन्यात भारतानं द.आफ्रिकेचा 9 विकेट्सनी धुव्वा उडवला. लंच ब्रेकच्या निर्णयामुळे हा सामना चर्चेचा ठरला, मात्र या सगळ्यात चर्चा होती ती हार्दिक पांड्याची…

हार्दिक पांड्या जेव्हा मैदानात उतरला तेव्हा त्याच्या हेअरस्टाईलनं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. लोक केस ब्राऊन किंवा फारफार तर रेड करतात, मात्र हार्दिकनं केस चक्क आपल्या जर्सीला शोभेल असे म्हणजेच निळे केले होते. 

हार्दिकच्या या हेअरस्टाईलची लोकांनी मजा घेतली नसती तरच नवल. लोकांनी हार्दिकचे फोटो एडीट करुन त्यावर चक्क मोर बसवले आहेत. सोशल मीडियात हार्दिकचे हे फोटो चांगलेच शेअर केले जात आहेत. मात्र हार्दिकनं आपल्या हेअरस्टाईलपेक्षा आपल्या खेळीनं चर्चेत राहावं, असं काही चाहत्यांचं म्हणणं आहे.