बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

श्रीलंका दौऱ्यात हार्दिक पांड्या भारताचा कर्णधार?, अजूनही एका नावाची चर्चा

मुंबई | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्युझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. त्याआधी सरावासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 5 कसोटी सामने खेळणार आहे. त्याचवेळी भारताचा आणखी एक संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघाचं वेळापत्रक व्यस्त करत श्रीलंका दौरा आयोजित केला आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंकेत जाईल, जेथे आयसीसी वर्ल्ड सुपर लीग अंतर्गत ते 3 एकदिवसीय सामने खेळतील, असा खुलासा सौरव गांगुली याने केला होता. परंतू विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता भारतीय संघ देखील ऑस्ट्रेलिया सारखी दोन टीम मैदानात उतरवणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आता भारतीय संघाचं नेतृत्व कोण करेल?, अशी शंका क्रिकेटप्रेमींमध्ये आहे.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामनात आणि इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघात स्थान दिलं नाही. त्यामुळे श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या मालिकेत त्याला कर्णधार पदाची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा रंगू लागली आहे. तर त्याशिवाय, भारतीय संघाचा सलामवीर शिखर धवन याला भारतीय संघाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते.

दरम्यान, इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेला श्रेयस अय्यर श्रीलंका दौऱ्यात खेळेल की नाही, याची अद्याप कोणतीही माहिती दिली गेली नाही. श्रेयस श्रीलंका दौऱ्यासाठी तयार असेल तर त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी असेल.

थोडक्यात बातम्या-

कोरोना रुग्णांना हे इंजेक्शन देऊ नका, WHOनं भारताला दिला महत्त्वाचा सल्ला

दूरदृष्टी! कोविडकाळात व्हायरल होतोय अटल बिहारी वाजपेयींचा ‘हा’ व्हिडीओ

कोरोनावर प्रभावी औषध शोधल्याचा दावा, महाराष्ट्रातील सांगलीत उत्पादन सुरु

“पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला महिन्याला 29 कोटी डोस देणार”

क्वारंटाईन संपलेल्या आजोबांना आणायला गेले नातेवाईक, समोर आला अत्यंत धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More