Hardik Pandya l बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हे घटस्फोटाच्या मुद्द्यावरून कायमच चर्चेत असतात. हार्दिक आणि नताशाने लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच त्या दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. मात्र घटफोट होऊन बराच काळ लोटला असाल तरी देखील ते दोघे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अशातच आता नताशा तिच्या मुलासोबत म्हणजेच अगस्त्यसोबत पुन्हा भारतात परतली आहे.
नताशाच्या पोस्टमुळे सर्वत्र खळबळ :
अभिनेत्री नताशा ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मनातील भावना नेहमी व्यक्त करताना दिसत असते. अशातच आता देखील नताशा हिने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये नताशा
ही रिलेशनमधील प्रामाणिकपणाबद्दल बोलताना दिसत आहे.
यावेळी पोस्टद्वारे नताशा म्हणाली की, ‘तुमच्या पाठीमागे असलेली निष्ठा ही खरोखरच सर्वोच्च आणि उत्तम दर्जाची आहे…’, याआधी देखील नताशा हिने अशा अनेक प्रकारच्या पोस्ट केल्या आहे. ज्यामुळे हार्दिक पांड्याने नताशाची फसवणूक केली अशी देखील चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
Hardik Pandya l हार्दिक या मुलीला करतोय डेट :
दुसरीकडे, हार्दिक पांड्या ब्रिटीश गायिका जास्मिन वालियासोबत डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अलीकडेच, दोघांनीही त्यांच्या ग्रीसच्या सुट्टीतील वेगवेगळ्या वेळी त्यांचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये एकच पार्श्वभूमी दिसत आहे, ज्यामुळे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा जोर धरत आहे.
नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्याने 2019 मध्ये डेटिंग सुरू केली होती. एका वर्षानंतर म्हणजेच 2020 मध्ये, दोघांनी क्रूझवर लग्न केले. मात्र त्यावेळी नताशा आणि हार्दिक प्रचंड चर्चेत आले होते.
News Title : hardik pandya dating jasmin walia
महत्वाच्या बातम्या-
शेअर बाजारात नवा स्कॅम; ‘या’ व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून होतेय फसवणूक
अजितदादांना मोठा झटका, कट्टर समर्थक शरद पवारांच्या गळाला?
सरकारकडून सर्वसामान्यांना मिळणार मोठं गिफ्ट, पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?
मोठी बातमी! अंबरनाथ MIDC कंपनीत गॅस गळती, केमिकल धूराने नागरिक त्रस्त
देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 3 राशींच्या आर्थिक समस्या दूर होतील!