“माझी 50 टक्के मालमत्ता…”, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य

Hardik Pandya Divorce | आयपीएल स्पर्धेत यंदाचं वर्ष मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्यासाठी म्हणावं असं चांगलं गेलं नाही. मैदानातही पांड्याला हूटिंगला सामोरं जावं लागलं आहे. पांड्याला म्हणावी अशी कामगिरी करता आली नाही. अशातच पांड्याच्या घटस्फोटाची (Hardik Pandya Divorce) जोरदार चर्चा सुरू आहे. पांड्याला आता आपल्या कमाईतून 50 ते 70 टक्के संपत्ती नाताशाला द्यावी लागणार असल्याची चर्चा आहे. (Hardik Pandya Divorce)

पांड्याच्या संपत्तीवर नताशाने दाखवला हक्क

नताशा आणि हार्दिक यांच्या घटस्फोटाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. नताशा आता पांड्याला घटस्फोट (Hardik Pandya Divorce) देण्याच्या तयारीत आहे. नताशा केवळ घटस्फोटच नाही तर आता तिने हार्दिकच्या 70 टक्के संपत्तीवर स्वतःचा हक्क असल्याचा दावा केला आहे.

मात्र नताशा पांड्याला घटस्फोट (Hardik Pandya Divorce) देणार असल्याची माहिती अद्यापही अधिकृतपणे समोर आली नाही. तसेच नाताशा काल आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली होती. यामुळे आता पांड्याला मोठा झटका बसण्याची शक्यता कमी आहे.

“सर्व संपत्ती ही माझ्या आईच्या आणि भावाच्या नावावर”

पांड्याकडे तब्बल 91 कोटींची संपत्ती आहे. यातील जर 70 टक्के संपत्तीवर स्वतःचा हक्क असल्याचा दावा नताशाने केला तर त्याला  63 कोटी द्यावे लागतील, अशी माहिती देखील समोर येत आहे. एका मुलाखतीत हार्दिकने मोठा खुलासा केला. माझ्या नावावर कोणतीच संपत्ती नाही. सर्व संपत्ती ही माझ्या आईच्या आणि भावाच्या नावावर आहे.

हार्दिकचा निर्णय हा नताशासह निराशजनक ठरू शकतो. पुढे पांड्या म्हणाला की, मी स्वतःच्या नावावर काहीही करणार नाही. पुढे जाऊन 50 टक्के मला कोणाला द्यायचे नाहीत… ‘ असं देखील हार्दिक म्हणाला होता.

पांड्याच्या संपत्तीबाबत बोलायचं झालं तर 91 कोटी रुपयांची संपत्ती आहे. मुंबईमध्ये 30 कोटींचं अलिशान घर आहे. शिवाय वडोदरा येथे पांड्याचा एक बंगला आहे. हार्दिक यांच्या गॅरेजमध्ये देखील महागड्या गाड्या आहेत. हार्दिककडे आठ गाड्या आहेत.

News Title – Hardik Pandya Divorce Romours He Say I Don’t Want To Give 50 Percentage To Any One

महत्त्वाच्या बातम्या

विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! दहावीचा निकाल थोड्याच वेळात पाहता येणार या वेबसाईटवर

मुंबईकरांनो सावधान! या तारखेपासून पाणी कपात होणार, पाणी जपून वापरा

कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी कारवाई, ससून रुग्णालयातील डॅाक्टरला अटक

हवामान विभागाने मान्सूनबाबत दिली महत्त्वाची अपडेट; राज्यात मान्सून कधी दाखल होणार?

केकेआरचा दणदणीत विजय; जाणून घ्या कोणाला किती रुपये मिळाले