खेळ

हार्दिक पांड्याला धक्का; फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्याने संघातील स्थान गमावलं

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेलाडू हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे. कारण पांड्या फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्याने त्याला भारत अ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यावरुन माघार घ्यावी लागणार आहे.

पांड्याच्या जागी तामिळनाडूच्या विजय शंकरला संधी देण्यात येणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होण्याआधी पांड्याची फिटनेस टेस्ट घेण्यात आली. यावेळी उतीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले गुण त्याला मिळाले नाहीत. त्यामुळे पांड्याला न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागणार आहे.

भारतीय क्रिकेट संघात स्थान टिकवायचं असेल तर प्रत्येक खेलाडूला यो-यो टेस्ट द्यावी लागते. हार्दिक पांड्या टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. भारत अ संघ कसोटी आणि वन-डे सामन्यासाठी न्यूझीलंडला जाणार आहे.

दरम्यान, हार्दिक पांड्या सध्या तिच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आहे. हार्दिक आणि तिच्या गर्लफ्रेंडचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

जावई बापूंनी जरा डोंबिवलीकडे लक्ष द्यावे; मनसे आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला

महाराष्ट्राचे चार भाग करा; मा. गो. वैद्यांची वादग्रस्त मागणी

“आम्ही या सरकारला कायमची सत्ता दिलेली नसून आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ”

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या