बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हार्दिक पांड्या म्हणतो, ‘जप्त केलेलं ते घड्याळ 5 कोटींचं नाही तर फक्त…’

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या याच्या विरोधात सीमा शुल्क विभागाने अर्थात कस्टम विभागाकडून जप्तीची कारवाई करण्यात आली. टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळून युएईहून भारतात परतलेल्या हार्दिक पांड्याला मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने अडवले आणि हार्दिक पांड्याचे दोन महागातले घड्याळ जप्त केले.

जप्त करण्यात आलेले या दोन घड्याळांची किंमत 5 कोटी रूपये असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. कस्टम विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईच्या चर्चांवर हार्दिक पांड्याने मौन सोडलं आहे. विमानतळावर उपस्थित असलेल्या कस्टम अधिकाऱ्यांना मी स्वत: सगळ्या सामानाची माहिती दिली होती. सोशल मीडियावर माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली जात असल्याचं हार्दिकने ट्विट करत म्हटलं आहे.

सोशल मीडियावर माझ्या घड्याळाची किंमत 5 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे जे खोटं आहे. माझ्या घड्याळाची किंमत दिड कोटी रूपये आहे, असं स्पष्टीकरण हार्दिक पांड्याने दिलं आहे. तर दुबईतून कायदेशीररीत्या खरेदी केलेल्या सगळ्या गोष्टी मी स्वत: घोषित केल्या होत्या. कस्टमने माझ्याकडे कागदपत्रे मागितली आणि मी संपूर्ण कस्टम ड्यूटी भरायला तयार असल्याचंही पांड्याने सांगितलं आहे.

तर कस्टम सध्या योग्य ड्यूटीचे मुल्यांकन करत आहेत. मी देशाचा कायदा पाळणारा नागरिक असून मी सर्व सरकारी संस्थांचा आदर करतो आणि मला कस्टम विभागाचे संपूर्ण सहकार्य लाभले असल्याचंही हार्दिक म्हणाला आहे. तर कायदेशीर मर्यादा ओलांडल्या असल्याचे माझ्यावर लागलेले आरोप पूर्णपणे निराधार असल्याचंही हार्दिक पांड्याचं म्हणणं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

‘त्या’ चिमुरड्यांच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूद पुन्हा बनला देवदूत

“वडील पट्टा लावून आडवे झालेत मुलगा परदेशात सेट झालाय”

आधार कार्ड व्हेरीफिकेशनसाठी नवा नियम! आता ‘ही’ असणार नवी प्रक्रिया

“निवडणुका जवळ आल्याने दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला”

“बाबांच्या विमानात पेंग्वीनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More