Hardik Pandya | क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांनी घटस्फोट घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडिया पेजवर याबाबत पोस्ट टाकून माहिती दिली होती. घटस्फोट घेतल्यानंतर नताशा ही परत आपल्या मायदेशी मुलगा अगस्त्यला घेऊन परतली आहे. तर, हार्दिक आता सिंगल आयुष्य जगत आहे. अशात हार्दिकबद्दल (Hardik Pandya) आता वेगळ्याच चर्चा रंगत आहेत. हार्दिक पांड्या पुन्हा प्रेमात पडला असल्याचं म्हटलं जातंय.
हार्दिकचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत. हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश गायिका जास्मिन वालिया (Jasmin Walia) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दोघेही ग्रीसमध्ये एकत्र सुट्टी घालवत असल्याचंही म्हटलं जातंय.
हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालियाचे फोटो व्हायरल
झालं असं की, हार्दिक पांड्याने (Hardik Pandya)एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये आजूबाजूचे दृश्य आणि जास्मिनने पोस्ट केलेल्या फोटोतील दृश्य एकच असल्याचं दिसून येत आहे. त्यातच हार्दिकने जास्मिनच्या काही पोस्ट देखील लाइक केल्या आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
विशेष म्हणजे दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात, यामुळे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याचा दावा सोशल मीडियावर नेटकरी करत आहेत. पाहायला गेलं तर, अद्याप हार्दिक किंवा ब्रिटिश गायिका जास्मिनने याबाबत अधिकृत अशी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, दोघांचे फोटो आता तूफान व्हायरल झाले आहेत.
कोण आहे जास्मिन वालिया?
जास्मिन वालिया ही एक प्रसिद्ध ब्रिटिश गायिका आहे. तिचे आई-वडील भारतीय वंशाचे आहेत. ‘द ओनली वे इज एसेक्स’ या ब्रिटीश रियॅलिटी टीव्ही मालिकेचा भाग बनल्यानंतर जास्मिन चर्चेत आली होती. ती बऱ्याचदा तिचे बोल्ड फोटो पोस्ट करते असते, जे खूप व्हायरल होतात. (Hardik Pandya)
News Title : Hardik Pandya Jasmin Walia photo went viral
महत्त्वाच्या बातम्या-
प्रफुल पटेलांना पराभवाची धूळ चारणारा ‘हा’ बडा नेता कॉँग्रेसच्या वाटेवर; भाजपला ठोकला रामराम
या दोन राशींच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होणार!
मोठी बातमी! काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांची तब्येत बिघडली, श्वास घेण्यास अडचण
नीरज चोप्राला झालाय ‘हा’ गंभीर आजार; प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार ऐकून थक्क व्हाल, लगेच करा अर्ज