Hardik Pandya Natasa Stankovic | भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पांड्या सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. हार्दिक पांड्याच्या वैवाहिक आयुष्यात सर्वकाही ठीक नसल्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्याच्या बायकोच्या एका कृतीने या सर्व चर्चांना चांगलंच बळ दिलं आहे.
या कारणांमुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा-
हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच (Hardik Pandya Natasa Stankovic) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियात रंगू लागल्या आहेत. नताशाने स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून पांड्या हे आडनाव काढून टाकले आहे. तिच्या या कृतीनंतर हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटांच्या चर्चांना जोरदार सुरुवात झाली
नताशानं फक्त आपल्या नावातलं पांड्या आडनावच हटवलं नाही तर ती हार्दिक सोबत दिसेनाशी झाली आहे. सध्या आयपीएल सुरु आहेस आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे, मात्र सुरुवातीला हार्दिक पांड्याला चिअर्स करण्यासाठी मैदानात दिसणारी नताशा गेल्या काही सामन्यांमध्ये मैदानात दिसून आलेली नाही.
बायकोमुळे हार्दिक पांड्या कंगाल होणार?
हार्दिक आणि नताशा (Hardik Pandya Natasa Stankovic) यांना जुलै 2020 मध्ये अगस्त्यचा नावाचा मुलगा झाला होता. 2023 साली त्यांनी उदयपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही रिती-रिवाजांनुसार लग्न केलं. हार्दिक पांड्याचं नताशासोबतचं हे लग्न चांगलंच चर्चेत आलं होतं, मात्र आता घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्याने या प्रकरणात हार्दिकला त्याच्या संपत्तीतील ७० टक्के हिस्सा नताशाला द्यावा लागेल, असं म्हटले जात आहे. या गोष्टीत तथ्य असेल तर बायकोमुळे हार्दिक पांड्या कंगाल होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.
हार्दिकने मुंबई इंडियन्समध्ये जाण्याचं कारण म्हणजे त्याला घटस्फोटासाठी पैसे उभं करणं गरजेचं होतं, असाही तर्क लावला जात आहे, मात्र या सर्व गोष्टींमध्ये किती तथ्य आहे याबद्दल सांगता येणार नाही. सध्यातरी दोघांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत आणि त्यामुळेच हार्दिक आणि नताशा (Hardik Pandya Natasa Stankovic) हे दोघेही सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.
हार्दिक पांड्याला किती मानधन मिळतं?-
हार्दिक पांड्याच्या मानधनाबद्दलही सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. आयपीएलमध्ये (IPL 2024) मुंबई इंडियन्स संघाकडून त्याला 15 कोटी रुपये मिळतात. गुजरातकडूनही त्याला तेवढंच मानधन मिळत होतं, मात्र ट्रान्सफर झाल्यावर त्याला एक खास रक्कम मिळाली होती. तसेच भारतीय क्रिकेट संघाकडूनही त्याला सामन्यांसाठी फी मिळते. याशिवाय जाहिरातींच्या माध्यमातून सुद्धा पांड्या दरवर्षी करोडो रुपयांची कमाई करतो.
News Title: Hardik Pandya Natasa Stankovic Divorce News
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्यानंतर नागपुरातही ‘हिट अँड रन’, मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवलं
काळजी घ्या! राज्यातील ‘या’ भागांमध्ये उष्णतेची लाट येणार
उद्धव ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक हरपला, ‘या’ नेत्याचं निधन
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
अग्रवालांनी ड्रायव्हरला डांबून ठेवलं!, धक्कादायक घटनाक्रम आला समोर; पोलिसांकडून आता आजोबाला अटक