Hardik Pandya Natasa Stankovic | क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासाठी यावर्षीचा आयपीएल हंगाम खूपच वाईट ठरला. हार्दिकची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी वर्णी लावण्यात आली. रोहितचं कर्णधारपद काढल्याने चाहत्यांनी हार्दिकला अगदी अखरेच्या सामन्यापर्यंत ट्रोल केलं. त्यात मुंबईची कामगिरी अत्यंत निराशादायक होती.
आयपीएलमधील अपयशानंतर हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्यातही संकट आल्याचं म्हटलं जातंय. हार्दिकच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याची जोरदार चर्चा आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच यांच्यात बिनसल्याची चर्चा आहे. ते दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं देखील म्हटलं जातंय.
अशी सुरू झाली हार्दिक-नताशाची लव्ह स्टोरी
अशात नताशाच्या डेटिंगबद्दल चर्चा होत आहेत. नताशा स्टँकोव्हिचला ‘डीजे वाले बाबू’ म्युझिक व्हिडिओमुळे लोकप्रियता मिळाली. ती ‘बिग बॉस’ आणि ‘नच बलिये’ सारख्या रिॲलिटी शोचा भागही राहिली आहे. तिला तिच्या प्रोफेशनल जीवनात अभिनेत्री म्हणून फारशी प्रसिद्धी मिळाली नसली तरी ती तिच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत राहिली. 2020 मध्ये तिने क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत लग्न केले.
नताशा आणि हार्दिक दोघेही पहिल्यांदा 2018 मध्ये एका नाईट क्लबमध्ये भेटले होते. नताशा (Hardik Pandya Natasa Stankovic) आणि हार्दिकचे अनेक कॉमन मित्र होते. 6 वर्षांपूर्वी हार्दिकने मुंबईत वाढदिवसाची पार्टी दिली होती. नताशाही या पार्टीत सामील झाली. इथेच दोघे पहिल्यांदा भेटले होते.
हार्दिक पांड्यापूर्वी कुणाच्या प्रेमात होती नताशा?
2018 मध्ये हार्दिक आणि नताशाच्या (Hardik Pandya Natasa Stankovic) पहिल्या भेटीनंतर त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी जानेवारी 2020 मध्ये साखरपुडा करत सर्वांनाच धक्का दिला. जुलै 2020 मध्ये त्यांच्या आयुष्यात अगस्त्य आला. हार्दिक आणि नताशा यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनी लग्न केले.
हार्दिकपूर्वी नताशाचे नाव अनेकांशी जोडले गेले. तिने टीव्ही अभिनेता अली गोनीलाही डेट केले होते. दोघांनी ‘नच बलिये’मध्ये एकत्र काम केलं होतं. पण नंतर त्यांचे नाते तुटले. त्यानंतर उद्योगपती सॅम मर्चंटसोबतही नताशाचे नाव जोडले गेले. सध्या सॅम मर्चंटचे नाव ॲनिमल स्टार तृप्ती डिमरीसोबत जोडले जात आहे. तृप्ती अनेकवेळा सॅमसोबत स्पॉट झाली आहे.
View this post on Instagram
या कारणांमुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा-
हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच (Hardik Pandya Natasa Stankovic) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियात रंगू लागल्या आहेत. नताशाने स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून पांड्या हे आडनाव काढून टाकले आहे. तिच्या या कृतीनंतर हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटांच्या चर्चांना जोरदार सुरुवात झाली
नताशानं फक्त आपल्या नावातलं पांड्या आडनावच हटवलं नाही तर ती हार्दिक सोबत दिसेनाशी झाली आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे, मात्र सुरुवातीला हार्दिक पांड्याला चिअर्स करण्यासाठी मैदानात दिसणारी नताशा गेल्या काही सामन्यांमध्ये मैदानात दिसून आलेली नाही.
News Title: Hardik Pandya Natasa Stankovic ex boyfriend
महत्त्वाच्या बातम्या-
“कायदा आणि नियम फक्त सामान्य माणसांना छळण्यासाठी आहेत काय?”
शिखर धवन ‘या’ महिला क्रिकेटरशी करणार दुसऱ्यांदा लग्न?; स्वतःच केला मोठा खुलासा
ग्राहकांनो खरेदीची करा घाई! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर
मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, ‘या’ लिंकवर पाहा गुण
बायकोमुळे हार्दिक पांड्या कंगाल होणार?, सोशल मीडियावर एका गोष्टीची जोरदार चर्चा