Hardik Pandya | क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याला आयपीएल सामन्यादरम्यान चाहत्यांकडून प्रचंड ट्रोल करण्यात आलं. मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यानंतर त्याची मैदानावर खूप टीका झाली. मात्र, वर्ल्ड कप सामन्यात हार्दिकच्या बॉलिंगने सर्वांचीच मनं जिंकली. त्याने टाकलेल्या अखेरच्या षटकाने सामन्याचं चित्र पालटलं. काही महिन्यांपुर्वी चाहत्यांनी त्याची स्लेजिंग केली तर, वर्ल्डकप जिंकल्यानंतर संपूर्ण देशाने हार्दिकचं नाव घेतलं.
हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. आयपीएल दरम्यान, हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच यांच्यात काहीतरी बिनसल्याचे म्हटले जात होते. इतकंच काय तर, दोघेही घटस्फोट घेणार, इथपर्यंत या चर्चा झाल्या. नताशाने तेव्हा सोशल मीडियावरून हार्दिकसोबतचे सगळे फोटो आणि व्हिडिओ देखील डिलिट केले होते.
हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चेला जोर
मध्यंतरी तिने हार्दिकसोबत आपले लग्नाचे फोटो पुन्हा टाकले. त्यानंतर या घटस्फोटाच्या चर्चा कुठेतरी थांबल्या होत्या. अशात या चर्चेला पुन्हा एकदा जोर आला आहे. T20 वर्ल्डकप भारताने जिंकल्यानंतर भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट शेअर करत भारतीय संघाचे कौतुकही केले. तसेच अनेक क्रिकेटरच्या पत्नी देखील स्टेडियममध्ये पोहोचल्या होत्या.
मात्र, यावेळी नताशा T20 वर्ल्डकपच्या सामन्यात पतीला सपोर्ट करण्यासाठी पोहोचली नाही. T20 वर्ल्डकप भारताने जिंकल्यानंतरही सोशल मीडियावर एकही पोस्ट नताशाने शेअर केली नाही. वर्ल्डकप जिंकल्यानंतर हार्दिक घरी पोहोचला. मात्र, आपल्या मुलासोबतचाच फोटो त्याचा व्हायरल झाला. नताशा ही हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) स्वागतासाठी उपस्थित नसल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
View this post on Instagram
अंबानींच्या फंक्शनमध्ये हार्दिक पांड्या एकटाच दिसला
त्याचबरोबर अनंत आणि राधिका यांच्या संगीत सेरेमनीमध्ये देखील हार्दिक (Hardik Pandya) एकटाच पोहोचल्याचं दिसून आलं.हार्दिक हा नताशा हिच्यासोबत फंक्शनमध्ये दाखल होईल, असं सर्वांना वाटलं होतं. पण, हार्दिक एकटाच कार्यक्रमात दाखल झाला. यामुळेच आता परत एकदा हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
सोशल मीडियावर हार्दिकचे एकट्याचेच कार्यक्रमातील फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे नेटकरी नताशा कुठे आहे?, असा सवाल आता उपस्थित करत आहेत. तसंच भारतीय संघाने T20 वर्ल्डकप जिंकला, त्यादिवशी नताशाने जिममध्ये व्यायाम करताना व्हिडिओ पोस्ट केला. मात्र, भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर साधी एकही पोस्ट तिने शेअर केली नाही. त्यामुळे सध्या हार्दिक आणि नताशा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
News Title- Hardik Pandya Natasa Stankovic relationship
महत्वाच्या बातम्या-
काळजी घ्या! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
ग्राहकांना दिलासा! सोन्याच्या दरात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोनं फक्त..
सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार; बटाटा-कांदा-टोमॅटोचे भाव तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले
अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात अमृता फडणवीस अन् लेक दिविजाच्या लुकने वेधलं लक्ष; पाहा Video
“आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी”; वायकरांवरील गुन्हे मागे घेताच संजय राऊतांचा हल्लाबोल