Hardik Pandya | क्रिकेटपटू हार्दिक पांड्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे सध्या चर्चेत आहे. हार्दिक पांड्याच्या व्यक्तीगत आयुष्यामध्ये सर्व काही ठीक नसल्याचं म्हटलं जातंय. हार्दिकचे पत्नी नताशा स्टँकोव्हिचसोबत (Natasa Stankovic) संबंध बिघडल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
इतकंच नाही तर, ते दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं देखील म्हटलं जातंय. त्यातच नताशा कालच मुंबईमध्ये एका मिस्ट्री मॅनसोबत दिसून आलीये. नताशाने जर हार्दिकला घटस्फोट दिला तर त्याला संपत्तीत नताशा स्टँकोव्हिचला 70 टक्के वाटा द्यावा लागेल, असं म्हटलं जातंय. अशात प्रश्न येतो की, हार्दिककडे (Hardik Pandya ) नेमकी किती संपत्ती आहे आणि त्याचा आकडा किती?, आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
हार्दिक पांड्याच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर कधीकाळी 200 रुपयांमध्ये टूर्नामेंट खेळणारा हार्दिक आज करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती 91 कोटी रुपये आहे. क्रिकेटशिवाय तो जाहिरातींमधूनही मोठी कमाई करतो.
जाहिरातींमधून कोटींची कमाई
अलीकडेच बीसीसीआयने सेंट्रल कराराची घोषणा केली होती. त्यात हार्दिकला (Hardik Pandya ) ग्रेड-A मध्ये स्थान देण्यात आलंय. त्यामुळे यावर्षी मंडळाकडून त्याला 5 कोटी रुपये मिळतील. हार्दिक पांड्या इंडियन प्रीमियर लीगमधूनही करोडोंची कमाई करतो. यंदाच्या आयपीएल हंगामापूर्वी, मुंबई इंडियन्सने त्याला 15 कोटी रुपयांना गुजरात टायटन्सकडून खरेदी केले.
यापूर्वी गुजरात टायटन्सने हार्दिकला IPL 2022 आणि IPL 2023 साठी प्रत्येकी 15 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. हार्दिकने आतापर्यंत बोट , Amazon Alexa, Reliance Retail, Star Sports Monster Energy, Britannia Bourbon, Sin Denim, Gulf Oil India, Dream11, Accelerate, Sold Store, या ब्रँडच्या जाहिराती केल्या आहेत.
View this post on Instagram
आलिशान महागड्या गाड्यांचे कलेक्शन
या ब्रँडच्या जाहिरातींमधून हार्दिक (Hardik Pandya ) कोटींची कमाई करतो. इतकेच नाही तर हार्दिकचे मुंबईतील वांद्रे येथे 30 कोटींचे घर असून, वडोदरा येथेही त्याचा एक आलिशान बंगला आहे. त्याच्याकडे आलिशान गाड्यांचे देखील कलेक्शन आहे.
हार्दिककडे Audi A6, Range Rover Vogue, Jeep Compass, Mercedes G Wagon, Rolls Royce, Lamborghini , Huracan EBO, Porsche Cayenne आणि Toyota Etios या महागड्या गाड्या आहेत.
News Title- Hardik Pandya Net Worth
महत्वाच्या बातम्या-
“गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद..”; ठाकरे गटाचा खळबळजनक दावा
हृदयद्रावक! गेमझोनमध्ये लागलेल्या आगीत 32 जणांचा होरपळून मृत्यू; अंगावर शहारे आणणारे PHOTO समोर
पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त?; जाणून घ्या तुमच्या शहरातील लेटेस्ट दर
आज सूर्यदेवाच्या कृपेने ‘या’ 5 राशींना मोठा धनलाभ होणार!
“कुणीतरी लवकरच रस्त्यावर..”; घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच हार्दिकच्या बायकोची खळबळजनक पोस्ट