Hardik Pandya | आयपीएलचा 2024 च्या हंगामात हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स संघाने केवळ 4 विजय मिळवले आहेत. पांड्या कर्णधार झाला तेव्हाही चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. हा सूर विजयाने बदलला जाईल अशी आशा होती. मात्र तसं घडलं नाही. जैसे थे परिस्थिती पाहायला मिळाली.
आज मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ जायंट्स यांच्यात लढत होताना दिसत आहे. ही मुंबई इंडियन्ससाठी शेवटची अंतिम लढत पाहायला मिळणार आहे. कारण या शेवटच्या सामन्यात आता केवळ औपचारिकता बाकी आहे. याचपार्श्वभूमीवर पांड्याने शेवटच्या सामन्याआधी घडघड बोलून दाखवलं आहे. त्याचा व्हिडीओ स्टार स्पोर्ट्सच्या अधिकृत ट्विटर हँडेलवर शेअर करण्यात आला.
काय म्हणाला पांड्या?
“माझी कर्णधार पदाची भूमिका सोपी आहे. मी 10 खेळाडूंसोबत मैदानात खेळायचं काम करतो. खेळाडूंची काळजी घेणे आणि आत्मविश्वास देणे. त्यांना आत्मविश्वास दाखवला आणि प्रेम दिलं तर ते देखील 100 टक्के खेळ मैदानात दाखवतील आणि मी हेच केलं”, असल्याचं हार्दिक पांड्या (Hardik Pandya) म्हणाला आहे.
“मला निकालाने काहीही फरक पडत नाही”
“मला निकालाने काहीही फरक पडत नाही. मी निकालाने नाहीतर दृष्टीकोनात्मकतेनं विचार करतो. आम्हाला आमचा दृष्टीकोन संघाला कामयस्वरूपी अनुकूल आहे”, असं पांड्या म्हणाला. सुरूवातीला पांड्याच्या नेतृत्वात संघाला तीन पैकी तिन्ही सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागल्याचं समजतंय. त्यानंतर पुन्हा चांगलं कमबॅक करत 4 सामन्यात चांगली कामगिरी झाली आणि विजय मिळवला. मात्र त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती पाहायला मिळाली होती.
.@hardikpandya7 believes in approach over result and feels it is important to give the team confidence in order for them to perform! 👏🏼
Will @mipaltan and Hardik end the campaign on a winning note? 🤔
Watch him in action as he takes on Lucknow in their final home game tonight!… pic.twitter.com/PTH0s97Zn8
— Star Sports (@StarSportsIndia) May 17, 2024
पांड्याला आयपीएल सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद दिल्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. तर त्याला अनेकदा भरस्टेडियममध्ये हूटिंग देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. पांड्याला 2022 वर्षात गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार करताच त्याने संघाला विजय मिळवून दिला होता. मागील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेण्यास यश मिळवलं. मात्र पांड्याला यंदाच्या 2024 वर्षात मुंबई इंडियन्सकडून कर्णधारपद देण्यात आलं मात्र त्याला ते व्यवस्थित पेलता न आल्याच्या चर्चा आहेत. (Hardik Pandya)
मुंबई इंडियन्स संघ – इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, नमन धीर, अंशुल कंबोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, मोहम्मद नबी, कुमार कार्तिकेय, देवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, ल्यूक वुड, हार्विक देसाई, जेराल्ड कोएत्झी, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, क्वेना मफाका.
News Title – Hardik Pandya Statement Before IPL Team Mi Vs LSG Between Match
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई कोणाचा बालेकिल्ला?, देवेंद्र फडणवीस थेट बोलले
मोठी बातमी! मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली
“…तर मी निवृत्ती घेतली असती”; देवेंद्र फडणवीसांचं सर्वांत मोठं वक्तव्य