Hardik Pandya | रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा 12 जुलैरोजी पार पडला. या शाही विवाह सोहळ्यात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. तसेच अनेक क्रिकेट पटूंची देखील यात उपस्थित होती. वर्ल्ड कप विजेत्या संघातील स्टार खेळाडू हार्दिक पांड्या याने अनंत अंबानीच्या वरातीमध्ये जोरदार डान्स केला. अशात त्याच्या एका व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हार्दिक पांड्या (Hardik Pandya) लग्नसोहळ्यात टकिलाची ऑर्डर देतानाचा त्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही प्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रिटी दिसत आहेत. यामध्ये रणबीर कपूर, अर्जुन कपूर असे स्टार्स दिसत आहेत. हे सर्वजण एकमेकांशी गप्पा मारत भेटताना दिसत आहेत.
अंबानींच्या लग्नातील हार्दिकचा व्हिडिओ व्हायरल
यादरम्यान हार्दिक (Hardik Pandya) आणि शिखर पहारियाचा भाऊ हातवारे करून ड्रिंक मागत होते. त्यानंतर वेटर त्यांच्या जवळ येताच हार्दिकने टकिला टकिला, दोन टकिला अशी ऑर्डर दिली. या व्हीडिओमध्ये हार्दिकचा आवाजही स्पष्ट ऐकू येत आहे. त्याचा हा व्हिडिओ आता तूफान व्हायरल झाला आहे.
नेटकरी त्याच्या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया नोंदवत आहेत. हार्दिकने वरातीमध्ये केलेला डान्सही खूपच चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी त्याच्यासोबत पत्नी नताशा ही अनुपस्थित होती. त्यामुळे याबाबतही वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या आहेत. दरम्यान, वर्ल्ड कप सामन्यात हार्दिकने उल्लेखनीय कामगिरी केली.
Hardik Pandya asking for “2 Tequila” in Ambani’s wedding. He will never change 🇮🇳😭😭😭#AnantAmbani #AnantwedsRadhika pic.twitter.com/WUwNeziNpj
— Farid Khan (@_FaridKhan) July 13, 2024
अखेरच्या फायनल मॅचमध्ये तर हार्दिकने कमालच केली. अंतिम सामन्यात 20 धावा देत 3 विकेट ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. तर, फलंदाजी करताना पंड्याने एकूण 6 डावांमध्ये एका अर्धशतकासह 144 धावा केल्या.
वर्ल्ड कप सामन्यात हार्दिकची उल्लेखनीय कामगिरी
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिकचं (Hardik Pandya) संपूर्ण देशवासीयांनी कौतुक केलं. आयपीएल सामन्यात त्याला चाहत्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. मुंबई इन्डियन्सचं कर्णधारपद रोहित शर्माकडून काढून हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलं होतं. त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजी होती. यामुळे हार्दिक प्रचंड ट्रोल झाला. मात्र, वर्ल्ड कपमधील त्याच्या कामगिरीनंतर त्याची जेवढी टीका झाली त्याच्या पेक्षाही अधिक पट कौतुक झालं. यावेळी हार्दिक पांड्या भारावून गेल्याचंही दिसून आलं. सध्या तो अंबानी यांच्या लग्नातील एका व्हिडिओमुळे चर्चेत आलाय.
News Title- Hardik Pandya Viral Video Of 2 Tequila Order
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! अमरावतीत सिटी बसने चौघांना चिरडले, 9 वर्षीय चिमूकल्याचा चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू
TATA-BSNL यांच्यात मोठा करार; जिओ, एअरटेलचं टेन्शन वाढणार?
मुंबई-पुण्यात घर घ्यायचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाकडून महत्वाची घोषणा
वर्षांनंतर सलमान-ऐश्वर्या आले पुन्हा एकत्र?, ‘त्या’ फोटोने चर्चेला उधाण
“महाराष्ट्रात जातीयवाद सुरूये, माझ्या मतदारसंघात 40 टक्के दलित व मुस्लिम तरी मी निवडून येतो”