हार्दिक पांड्याचं कार आणि घड्याळांचं कलेक्शन पाहून वेडे व्हाल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भारतील क्रिकेट संघात अष्टपैलू म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटपटू म्हणजे हार्दिक पांड्या(Hardik Pandya). अनेकदा पांड्या त्याच्या सोशल मीडिया स्टोरी आणि पोस्टमुळं चर्चेत येत असतो. हार्दिक पांड्या क्रिकेटशिवाय महागड्या गाड्या आणि घड्याळांचा शौकिन आहे.

जगातील सगळ्यात महागडी कार म्हणजे रोल्स राॅयस(Rolls Royce) आहे. ही महागडी कार सध्या हार्दिक पांड्याकडं आहे. या कारची किंमत 6.95 ते 7.95 कोटी इतकी आहे. ही कार एखाद्या चालत्या फिरत्या लग्झरी सारखी आहे. लॅम्बोर्गिनी (Lamborghini Huracan) हुराकन ही दुसरी स्पोर्ट्स कार पांड्याच्या कलेक्शनमध्ये आहे. ज्याची किंमत 3.71 कोटी ते 4.99 कोटी आहे.

मर्सिडीज जी वॅगन ही तिसरी वेगवान कार पांड्याकडं आहे. या कारची किंमत 1.72 कोटी इतकी आहे. या कारची ऑफ-रोड ड्रायव्हिंग क्षमता 4.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवते. ऑडी6 आणि जीप कंपास या दोन महागड्या कारदेखील पांड्याच्या कलेक्शनमध्ये आहेत.

कारशिवाय हटके घड्याळ्यांचा देखील पांड्या शौकीन आहे. मध्यंतरी एअरपोर्टवर महागडं घड्याळ (clocks) सापडल्यामुळं पांड्या चर्चेत आला होता. पांड्याकडं 38 लाखांपासून 3 कोटीपर्यंतची घड्याळं आहेत. 2020 मध्ये पांडयानं पाटेक फिलिप नाॅटिलस प्लेटिनम 5712R (Patek Philippe Nautilus Platinum) लाॅन्चसह विकत घेतलं होतं. त्याची किंमत सुमारे 1.65 कोटी रुपये आहे.

हार्दिककडं रोलेक्स काॅस्मोग्राफ डेटोना (Rolex Cosmograph Daytona) च्या सिरीज मधील 18 सीटी गोल्डमध्ये आय टायगर घड्याळं आहे, ज्याची किंमत एक कोटीच्या आसपास आहे. 18 कॅरेट रोझ गोल्डचे ऑडेमार्स प्युगेटचे (Audemars Piguet) देखील घड्याळं हार्दिककडं आहे. त्याची किंमत 89-95 लाखांपर्यंत आहे.

महत्त्वाच्या बातम्या