आंदोलन मागे घेण्यासाठी हार्दिकला 1200 कोटींची ऑफर?

अहमदाबाद | पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेलं आंदोलन मागे घेण्यासाठी भाजपने आपल्याला 1200 कोटी रुपये देऊ केले होते, असा खळबळजनक दावा पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने केलाय. 

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटीदार अनामत आंदोलन समितीची भमिका स्पष्ट करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. यावेळी त्याने आरक्षणाविषयीचा काँग्रेसचा प्रस्ताव मान्य असल्याचं सांगितलं.

दरम्यान, आपण जेव्हा जेलमध्ये होतो तेव्हा राज्याचे मुख्य सचिव कैलासनाथन माझ्याकडे एक प्रस्ताव घेऊन आले होते. या प्रस्तावानूसार आंदोलन मागे घेतल्यास मला 1200 कोटी रुपये देऊ, अशी ऑफर देण्यात आली होती, असं हार्दिकनं म्हटलंय.