हार्दिकच्या ‘सावली’नं साथ सोडली, भाजपसोबत जाण्याचा निर्णय!

अहमदाबाद | गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटीदार आरक्षणाचा नेता हार्दिक पटेलला मोठा धक्का बसला आहे. हार्दिकची सावली म्हणून ओळखला जाणारा केतन पटेल भाजपमध्ये सामील झालाय. 

केतनआधी रेश्मा पटेल आणि वरुण पटेल भाजपमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर चिराग पटेल आणइ महेश पटेल यांनीही भाजपसोबत जाणं पसंत केलं होतं. 

दरम्यान, हार्दिकसोबत केतनवरही राष्ट्रद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. मात्र नंतर तोच हार्दिकच्या विरोधात साक्षीदार बनला होता.