हार्दिक पटेलच्या उपोषणाचा नववा दिवस, तयार केलं मृत्यूपत्र!

अहमदाबाद | गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने आपले मृत्यूपत्र तयार केले आहे. आपल्या बेमुदत उपोषणाच्या नवव्या दिवशी त्याने हे पत्र जाहीर केले आहे. 

मृत्यूपत्रात हार्दिकने त्याची संपत्ती आई-वडील आणि एका गोशाळेत विभागली आहे. त्यात त्याने आपले डोळे दान करण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. आपला शरिरावर भरोसा नाही म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचं हार्दिकने सांगितलं.

दरम्यान, पाटीदार समाजाला आरक्षण, शेतकरी कर्जमाफी आणि सहकारी अल्पेश कठिरिया याच्या सुटकेच्या मागणीसाठी हार्दिक उपोषणाला बसला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-नक्षलवाद्यांनी भाजप सरकार उलथवण्याचा कट रचल्याचे विधान मूर्खपणाचे- शिवसेना

-शिस्तीचा आग्रह धरणाऱ्यांवर आज हुकूमशाहीचा आरोप केला जातोय- मोदी

-झाडावरचे नारळ काढून इशांत लंबू झाला- सचिन तेंडुलकर

-मराठा तरुण अस्वस्थ; आणखी एकानं विहिरीत उडी मारुन जीव संपवला!

-आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा; कोहली नव्हे या खेळाडूकडे कर्णधारपद!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या