देश

गेल्या 20 दिवसांपासून हार्दिक पटेल गायब; पत्नी किंजलचा दावा

अहमदाबाद | गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनात झळकलेला नेता हार्दिक पटेल गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता असल्याचा दावा त्याची पत्नी किंजलने केला आहे. गुजरात पोलीस मुद्दाम हार्दिक यांना लक्ष्य करत असल्याचा आरोपही किंजल यांनी केला आहे.

हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली 18 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. पोलिसांकडूनच आता हार्दिक कुठे आहेत, असा सवाल विचारला जात आहे. पोलिसांच्या या प्रश्नावरुन किंजल यांनी हार्दिक बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

हार्दिक यांनी इतर कोणत्याही लोकांना भेटू नये असं गुजरात सरकारला वाटत आहे. त्यामुळे त्यांना अशी वागणूक देत असल्याचा आरोप किंजल यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी हार्दिक पटेल लढत आहेत. 25 ऑगस्ट 2015 रोजी हार्दिक पटेल यांनी आरक्षण रॅली काढली होती. या रॅलीमुळे गुजरातमध्ये हिंसाचार भडकला होता. यावेळी हार्दिकसह त्याच्या इतर सहकाऱ्यांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेशी अनेकांनी भाजपध्ये प्रवेश केला त्यामुळे आता त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप होत नाही, असंही किंजल यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

मुंबईच्या डबेवाल्यांना हक्काची घरं मिळणार- अजित पवार

कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा तपास NIAकडे द्यायला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, राष्ट्रवादी मात्र नाराज!

महत्वाच्या बातम्या-

औरंगाबादचं नाव संभाजीनगर होत असेल तर यात वावगं काय?- राज ठाकरे

पोरगी पळून गेली; बापानं चौकाचौकात श्रद्धांजलीचे पोस्टर लावले

शिवरायांवरचा हा टिकटाॅक व्हीडिओ सोशल मीडियात तुफान लोकप्रिय!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या