…तर 2019 नंतर कोणत्याच निवडणुका होणार नाहीत- हार्दिक पटेल

अलिबाग | देशातील सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन मोदींविरोधात लढण्याची गरज आहे. तसं झालं नाही तर 2019 नंतर कोणत्याच निवडणुका होणार नाहीत, असा दावा हार्दिक पटेलने केला आहे. 

अलिबागमध्ये संभाजी ब्रिगेडचं दोन दिवसीय अधिवेशन पार पडतंय. या अधिवेशनाला हार्दिक पटेलला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी तो बोलत होता. 

मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली न निघाल्यास भाजपला निवडणूक जड जाईल, असं हार्दिक पटेलने यावेळी सांगितलं. 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवण्याआधी राज्यातील रोजगाराचा प्रश्न सरकारने सोडवायला हवा, असंही हार्दिक म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या-

-मेधा कुलकर्णींना कोथरुडमधून हरवणार; रुपाली चाकणकरांचं ओपन चॅलेंज

-राज ठाकरेंचं ‘वर्मा’वर बोट; व्यंगचित्रातून नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल

-पुण्यातील भाई-दादांना दणका; 11 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

-…तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर कपडे राहिले नसते!

-…तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डमरु वाजवत होते का?- हार्दिक पटेल

या बातमीवर तुमची कमेंट लिहा