सीडी बनवण्याच्या नादात भाजप जाहीरनामा बनवायला विसरला!

अहमदाबाद | सीडी बनवण्याच्या नादात भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करायचाच विसरला. गुजरातमधून विकासाबरोबर निवडणूक घोषणापत्र गायब झालंय, असा टोला पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेलनं भाजपला लगावलाय.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र अद्यापही भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे हार्दिकनं भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय.

भाजपनं गुजरातच्या जनतेचा अपमान केलाय. गुजरातच्या लोकांवर अविश्वास दाखवलाय. भाजपकडे गुजरातच्या भविष्यासाठी दृष्टिकोन नाही, कोणत्याही संकल्पना नाही, अशी टीकाही राहुल गांधींनीही ट्विटरद्वारे केलीय.