गुजरातमध्ये भाजपला फक्त 70 जागा मिळतील- हार्दिक

अहमदाबाद | गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त 70 जागा मिळतील तर काँग्रेस 100 जागांवर विजयी होईल, असा दावा पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने केलाय. 

भाजपने आपला पराभव मान्य केलाय, त्यामुळेच त्यांनी निम्मी सरकारी यंत्रणा कामाला लावलीय, असं हार्दिकने म्हटलंय. अहमदाबादच्या विरमगाममध्ये मतदान केल्यानंतर तो बोलत होता.

दरम्यान, सरकारी कार्यालयांमधून महत्त्वाच्या फायली गायब होण्यास सुरुवात झाल्याचा धक्कादायक आरोपही हार्दिकनं केलाय.