मराठा आंदोलनाला पाठींबा, महाराष्ट्रात येऊन आंदोलनात सहभागी होणार!

मुंबई | मराठा आरक्षणाला माझा पाठींबा आहे, मराठा समाजातील 5-50 लोक श्रीमंत आहेत, त्यांची घरं मुंबईत आहेत, याचा अर्थ सगळेच मराठा श्रीमंत आहेत असा होत नाही. असं मत पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलनं एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं

विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था पाहा, त्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. मराठा समाजात मोठ्या प्रमाणात गरीबी आहे, असंही हार्दिकनं सांगितलं.

सगळे एकत्र मिळून चांगलं काम करू, त्यासाठी मी महाराष्ट्रात येणार आहे, मराठा आंदोलनात सहभागी होणार आहे, असं त्यानं स्पष्ट केलं