नवी दिल्ली | राज्यसभा निवडणुकीपूर्वी गुजरात काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या या आमदारांविषयी मंगळवारी काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
जनतेला धोका देणाऱ्या आमदारांना चारचौघांत फटकारायला हवं तसेच भाजपकडून 20 ते 60 कोटी रुपयांत एक आमदार खरेदी करण्यात येत आहे, असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे.
विकले जाणारे आमदार मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जावून पैसे घेत असल्याचा आरोपही हार्दिक पटेल यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, गुजरात काँग्रेसमधील पाच आमदारांनी रविवारी राजीनामा दिला आहे. यामध्ये प्रवीण मारू, मंगल गावित, सोमाभाई पटेल, जेवी काकडिया आणि प्रद्युम्न जडेजा यांचा समावेश आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
बंडखोर आमदारांना भेटायला गेलेल्या दिग्विजय सिंहांना अटक
रस्त्यावर थुंकल्यास आता भरावा लागणार तब्बल इतका दंड!
महत्वाच्या बातम्या-
कोरेगाव भीमा प्रकरणी आयोगाकडून शरद पवारांना बोलवणं; 4 एप्रिल रोजी हजर राहण्याचा आदेश
सर सलामत तो पगडी पचास; आव्हाडांचं कोरोनापासून वाचण्यासाठी आवाहन
अमिताभ बच्चनही आयसोलेशनमध्ये, हातावर BMCचा ‘शिक्का’
Comments are closed.