बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या आमदारांना जनतेने चपलीने मारायला हवं”

गांधीनगर | गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीअगोदर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यासभा निवडणुकीअगोदर काँग्रेसच्या तीन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेता हार्दिक पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या आमदारांना जनतेने चपलीने मारायला हवं, असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे. 2017 मधील पाटीदार आंदोलनातील त्यांचे जवळचे सहकारी आमदार बृजेश मेरजा यांनी दिलेल्या राजीनाम्यावर हार्दिक पटेल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मला विश्वास आहे की जनता या धोकेबाज आमदारांना पोटनिवडणुकीत चांगला धडा शिकवील, जसं की जनतेने या अगोदरही केलेलं आहे, असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसने तीन गटात आपल्या आमदारांची विभागणी केली असून, गुजरातमधील अंबाजी, राजकोट आणि वडोदरा या ठिकाणच्या रिसॉर्टवर त्यांना ठेवलं असल्याची माहिती मिळाली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला सरकार जबाबदार- प्रविण दरेकर

“आधी लोकसभा आणि विधानसभेचे वर्ग भरवा, मगच मुलांना शाळेत बोलवा”

महत्वाच्या बातम्या-

राज्यसभा निवडणुकीअगोदर गुजरातमध्ये राजकीय स्फोट होण्याची शक्यता; काँग्रेसमध्ये खळबळ

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील धारावीसाठी गुडन्यूज!

अर्थव्यवस्थेवरुन टीका करणाऱ्या राजीव बजाज यांना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More