“या कारणामुळेच ‘RSS’च्या चेल्यांनी सरदार पटेलांचं नाव बदललं”
अहमदाबाद | जगातील सर्वात मोठं स्टेडियम गुजरातच्या अहमदाबादमध्ये उभारण्यात आलं आहे. जगातील सर्वात जास्त प्रेक्षक संख्या असलेल्या ‘सरदार पटेल स्टेडियम’ला आता ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’हे नाव देण्यात आलं आहे. यावरून आता वाद निर्माण झाला आहे. याबाबत गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष हर्दिक पटेल यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमध्ये उभं राहिलं याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, या स्टेडियमला सरदार पटेलांचं नाव दिलेलं असताना नाव बदलून नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम असं नाव का देण्यात आलं? हा सरदार वल्लभ पटेलांचा अपमान असल्याची भावना यावेळी हार्दिक पटेलांनी व्यक्त केली आहे.
भारतरत्न सरदार पटेलांनी आरएसएसवर बंदी आणली होती, त्याचा बदला घेत आज आरएसएसचे चेले सुड भावनेतून सरदार पटेलांचं नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. सरदार पटेलांच्या नावाशी वरवर मैत्री करून मनातून सूड भावनेने काम करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या सोबतच गुजरात आणि देशातील जनतेच्या मनातून सरदार पटेलांचं नाव कधीच पुसलं जाऊ शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय सरदार पटेलांचा अपमान या देशातील जनता सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी हर्दिक पटेलांनी नरेंद्र मोदींना दिला आहे.
दुनिया के सबसे बड़े अहमदाबाद स्थित सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम का नाम बदलकर नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम रखा गया है, क्या यह सरदार पटेल का अपमान नहीं हैं ? सरदार पटेल के नाम पर मत माँगने वाली भाजपा अब सरदार साहब का अपमान कर रही हैं। गुजरात की जनता सरदार पटेल का अपमान नहीं सहेगी।
— Hardik Patel (@HardikPatel_) February 24, 2021
भारत रत्न, लोह पुरुष सरदार पटेल ने आरएसएस पर प्रतिबंध लगाया था और उसी कारण आरएसएस के चेले सरदार पटेल का नाम मिटाने का हर संभव प्रयास कर हैं। बाहर से मित्रता पर भीतर से बैर, यह व्यवहार भाजपा का सरदार पटेल से हैं। एक बात याद रखिएगा की सरदार पटेल का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। 😡
— Hardik Patel (@HardikPatel_) February 24, 2021
थोडक्यात बातम्या-
“मी त्यांना वाघ म्हणणार नाही, संत म्हणतो… संत संजय राठोड लगे रहो!”
मजबुरी का नाम उद्धव ठाकरे!; “मंत्र्याची हकालपट्टी करण्यापासून कोण रोखत आहे?”
“मी ठरवेन तेच धोरण आणि मी लावेन तेच तोरण, या अहंकारात मंत्रिमंडळ”
‘टाईमपास’मधील प्राजूचा ग्लॅमरस अंदाज! पहा फोटो…
“मुख्यमंत्री बलात्काऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसलेत, संजय राठोडला तर चपलेनं झोडलं पाहिजे”
Comments are closed.