अमित शहांचे जोडे बनून राहणारांनाच ‘अच्छे दिन’- हार्दिक

गांधीनगर | गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर हार्दिक पटेलांच्या आरोपांची धार काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. आता त्याने भाजपाध्यक्ष अमित शहांना लक्ष्य केलंय. 

भाजपमध्ये योग्य लोकांचा सन्मान केला जात नाही. अमित शहांच्या पायातील जोडे बनणाऱ्यांनाच संधी दिली जाते, असं हार्दिक पटेलने म्हटलंय. 

चांगली खाती न मिळाल्यानं उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी भाजपला रामराम ठोकण्याचे संकेत दिलेत. त्यावरुन हार्दिकने अमित शहांना लक्ष्य केलंय.