महिन्याने निकाल लागत असेल तर ईव्हीएमचा उपयोग काय?

अहमदाबाद | ईव्हीएम वापरुन देखील हिमाचलसारख्या निवडणुकीचा निकाल महिन्याने येत असेल तर ईव्हीएमचा उपयोग काय?, असा सवाल पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने केलाय. यासंदर्भात त्याने काही ट्विट केलेत. 

निवडणुका जलद पार पडाव्यात यासाठी ईव्हीएमचा वापर केला जातो. मात्र निवडणुका संपल्यानंतर 7-8 दिवस ते मशिन्स बंद खोलीत ठेवण्यात येतात. यापेक्षा बॅलेट पेपरचा वापर करणं कधीही चांगलं आहे. त्यालाही तेवढाच वेळ लागतो, असं हार्दिकनं म्हटलंय. 

दरम्यान, मतदान केल्यानंतरही आपलं मत योग्य त्या व्यक्तीला गेलं की नाही याची चिंता मतदाराला असते, त्यामुळे ईव्हीएमवर मंथन होणं गरजेचं आहे, असंही त्यानं म्हटलंय.