#Video | हार्दिक पटेलचा ‘तो’ कथित व्हिडीओ अखेर व्हायरल

गांधीनगर | गुजरात निवडणुकीपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचा असल्याचं बोललं जातंय.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रूममध्ये मुलगी बसलेली आहे. मुलीबरोबर असणारी व्यक्ती हार्दिक असल्याचं विरोधकांकडून बोललं जातंय. हा व्हिडीओ हार्दिकच्या विरोधकांकडून व्हायरल होत आहे. परंतु या व्हिडीओत हार्दिकच आहे का? याबाबत संभ्रम आहे.

हा व्हिडीओ म्हणजे घाणेरडं राजकारण असल्याचं हार्दिकनं म्हटलंय. तर या व्हिडीओमध्ये वाईट काय आहे?, असा प्रश्न हार्दिकच्या समर्थकांनी केलाय.

दरम्यान, भाजपकडे माझा सेक्स व्हिडीओ असून तो पाहा आणि मजा घ्या असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी हार्दिकनं केलं होतं.