हार्दिक पटेलची मोठी घोषणा, आरक्षणासाठी काँग्रेसला पाठींबा

अहमदाबाद | पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने अखेर आपले पत्ते ओपन केले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी त्याने थेट काँग्रेसला समर्थन दिलं आहे. 

काँग्रेसने पाटीदारांच्या आंदोलनाची मागणी मान्य केली आहे. सत्तेत आल्यानंतर घटनेच्या चौकटीत राहून काँग्रेस पाटीदारांसाठी आरक्षणाचा प्रस्ताव पास करणार असल्याचं त्यानं सांगितलं. 

दरम्यान, भाजपविरोधात लढणं म्हणजेच काँग्रेसला समर्थन असं हार्दिकनं सांगितलं. तसेच अपक्ष उमेदवारांना मतदान करु नका, असं आवाहनही त्यानं पाटीदार समाजाला केलं आहे.